मी राज्यातील जनतेची माफी मागतो - कुमारस्वामी

कर्नाटक विधानसभेत  थोड्याच वेळात मतदान होण्याची शक्यता आहे. 

ANI | Updated: Jul 23, 2019, 07:01 PM IST
मी राज्यातील जनतेची माफी मागतो - कुमारस्वामी title=

बंगळुरु : कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरु आहे. दरम्यान, थोड्याच वेळात मतदान होण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देणार का याचीही उत्सुकता आहे. जर विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले तर सरकार कोसळणार, अशी स्थिती आहे. मात्र, मी राज्यातील जनतेची माफी मागतो, असे सांगत सत्तेतून बाजुला होणार, असल्याचे संकेत कुमारस्वामी यांनी दिले आहेत. त्यामुळे काही वेळातच याबाबच चित्र स्पष्ट होईल.

काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली म्हणून मला केंद्रामधील सरकारने कोणतीच मदत केलेली नाही. मी जर काही चूक केली असेन तर माझा कान पकडा आणि चांगले केले असेल तर चांगलं म्हणा, असे सागंत माझे सरकार निर्लज्ज सरकार नाही. मी भाषण करून पळून जाणार नाही. मी विश्वासमताला सामोरे जाणार आहे, असे कुमारस्वामी यांनी यावेळी भाषण करताना सांगितले.

दरम्यान, बंगळुरूत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पोलिसांनी बंगळुरूमध्ये आज आणि उद्या १४४ कलम लागू केले आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांनी नव्हे तर आपला विश्वासघात मुंबईत लपलेल्या बंडखोर आमदारांनी केला, अशी टीका कर्नाटकातीलकाँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी केली. कर्नाटक विधानसभेत त्यांनी हे वक्तव्य केले. मी एका बंडखोर आमदाराशी बोललो तेव्हा त्यांनी मला इथून सोडवा, अशी विनवणी केली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. त्या सर्व बंडखोरांना इथे येऊ दे आणि आपले म्हणणे मांडू दे असे आवाहनही शिवकुमार यांनी केले.