मुंबई : महिंद्रा ग्रुपचे चेयरमॅन आनंद महिंद्रा यांनी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एक कल्पना आखली आहे. गुरुवारी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत कंपन्यांना कोविड19 लसींचा थेट पुरवठा सुरू होईल, तोपर्यंत उघड्यावर लसीकरण शिबिरे भरवून रुग्णालयांना मदत करता येईल. असे केल्याने रुग्णालयांमध्ये अन्य कामे थांबणार नाहीत आणि मोकळ्या ठिकाणी शिबिरे लावून अधिक लोकांना लसी दिल्या जाऊ शकते.
स्थानिक डॉक्टरांनी दिलेल्या योजनेत त्यांनी सांगितले की, स्थानिक क्लबच्या सहकार्याने लसीकरण मोकळेपणाने सुरू केले जाऊ शकते. असे केल्याने, कोरोना संसर्ग देखील टाळता येतो आणि लसीकरणाचा वेग देखील वाढविला जाऊ शकतो.
मोठ्या शहरांमधील कंपन्यांनी त्यांच्या मोकळ्या जागेवर लसीकरण करने अपेक्षित होते. परंतु लसीचे उत्पादन कमी असल्याने केवळ जिल्हा रुग्णालय आणि राज्य रुग्णालयाला प्राधान्य दिले जात आहे. पुढे महिंद्र म्हणाले की, "जोपर्यंत थेट कंपन्यांना लसीं पुरवल्या जात नाहीत. तो पर्यंत आम्ही रुग्णालयांना अशा प्रकारचे शिबिरे लावून आर्थिक मदत करू शकतो."
A Doctor from a local Hospital told me of plans to work with local clubs to utilise their open spaces for creating vaccination camps. It allows efficient handling of larger numbers & prevents the vaccine drive from intruding on the hospital’s regular activities. (1/3)
— anand mahindra (@anandmahindra) April 22, 2021
यावेळी संपूर्ण देश कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या विळख्यात आहे. ज्याने भयानक रूप धारण केले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत 3 लाखाहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. सध्या भारतातील 26 लाख 82 हजार 751 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मृत्यूच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, तो दिवसेंदिवस वाढून 1 लाख 92 हजार 311 झाला आहे. त्याच वेळी, 1 कोटी 40 लाख 85 हजार 311 रुग्ण कोरोना संसर्गाने बरे झाले आहेत.