'नथूरामायण' चिघळलं, साध्वीच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपा अध्यक्षांकडून नोटीस

'नथूराम गोडसेंबाबत भाजपा नेत्यांच्या 'त्या' वक्तव्यांचा आणि पक्षाचा काही देणं-घेणं नाही'

Updated: May 17, 2019, 01:17 PM IST
'नथूरामायण' चिघळलं, साध्वीच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपा अध्यक्षांकडून नोटीस  title=

नवी दिल्ली : भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षामधील वाचाळवीरांबाबत कठोर पवित्रा घेतला आहे. भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे, खासदार नलीनकुमार कातील यांना नथूराम गोडसेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी, वक्तव्याचं समर्थन केल्याप्रकरणी नोटीस बजावलीय. भाजपाच्या शिस्तपालन समितीनं या तीनही नेत्यांकडून दहा दिवस उत्तर मागवलंय. या नेत्यांनी आपलं वक्तव्य मागे घेत माफीही मागितली मात्र सार्वजनिक जीवन आणि भाजपाच्या विचारधारेच्या विपरित या वक्तव्यांची गांभीर्यानं दखल घेतलीय. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, नलिनकुमार कटील आणि अनंतकुमार हेगडे यांची ती वैयक्तिक विधानं असून त्याचा पक्षाशी संबंध नसल्याचं म्हटलंय. 

 Amit-Shah

नथूराम गोडसेंबाबत भाजपा नेत्यांच्या 'त्या' वक्तव्यांचा आणि पक्षाचा काही देणं-घेणं नसल्याचं, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलंय. नथूराम गोडसे यांच्याबद्दल केलेली ती वक्तव्य वैयक्तिक होती... सोबतच तीनही नेत्यांनी आपापली वक्तव्य मागे घेत माफीनामा सादर केल्याचंही अमित शहा यांनी म्हटलंय. या तीनही नेत्यांकडून पक्ष जबाब मागणार आहे आणि १० दिवसांच्या आत पक्षाला आपला अहवाल सादर करेल, असंही अमित शहा यांनी म्हटलंय. 

दुसरीकडे, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्या 'नथुराम गोडसे' वादग्रस्त वक्तव्यानंतर केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून साध्वीची पाठराखण करण्यात आली होती. 'माफीची गरज नाही... गोडसे यांच्याप्रती आपली नजर बदलण्याची गरज आहे... ७० वर्षानंतर का होईना बदललेल्या वैचारिक वातावरणात गोडसे यांच्यावर चर्चा होत आहे. गोडसेंनाही या चर्चेमुळे आनंद होत असेल' असं हेगडे यांच्या ट्विटरवर दिसलं... परंतु, आता मात्र अनंत कुमार हेगडे यांनी आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाला असून 'ते' ट्विट आपण केलं नसल्याचा दावा केलाय.