काँग्रेसला जागा दाखवून देणार : अमित शाह

कर्नाटक निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राज्यात जोरदार प्रचाराला सुरूवात झाली आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 14, 2018, 11:17 AM IST
काँग्रेसला जागा दाखवून देणार : अमित शाह title=

बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राज्यात जोरदार प्रचाराला सुरूवात झाली आहे. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी वीरराणी कित्तुर चनम्मा आणि क्रांतीवीर संगोळी रायणा यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मतदारांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाह यांनी येत्या निवडणुकीत मदतार काँग्रेसला आपली जागा दाखवून देतील. आणि राज्यात भाजपला निवडून देतील, असं वक्तव्य करत काँग्रेसवर निशाणा साधलायं. 

दरम्यान, येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानावर प्रक्षोभक विधान केल्याचा ठपका ठेवत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरूजींवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून बेळगाव पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

माजी आमदाराला आणि हे मैदान उद्ध्वस्त करणाऱ्याला त्याची जागा दाखवून द्या, तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करून मराठी बाणा दाखवा असं जाहीर आवाहन संभाजी भिडे यांनी केलं होतं.