Amazon-Flipkart चा Republic Day सेल 'या' दिवसापासून होणार सुरू; 80% पर्यंतची सूट

amazon flipkart republic day sale : फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने रिपब्लिक डे सेलची घोषणा केली आहे. Amazon चा ग्रेट रिपब्लिक डे सेल 17 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत सुरू असेल. Amazon प्राइमचे सदस्य या सेलचा 24 तास आधीपासून लाभ घेऊ शकतील.

Updated: Jan 13, 2022, 02:09 PM IST
Amazon-Flipkart चा Republic Day सेल 'या' दिवसापासून होणार सुरू; 80% पर्यंतची सूट title=

मुंबई : फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनने रिपब्लिक डे सेलची घोषणा केली आहे. Amazon चा ग्रेट रिपब्लिक डे सेल 17 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत सुरू असेल. Amazon प्राइमचे सदस्य या सेलचा 24 तास आधीपासून लाभ घेऊ शकतील.

Sale

Amazon प्राइमचे सदस्य 16 जानेवारीपासूनच या सेलचा लाभ घेऊ शकतील. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल देखील 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे.  Flipkart चा हा सेल 22 जानेवारीला संपणार आहे. फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य, या सेलचा लाभ 16 जानेवारीपासून घेऊ शकतील.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये ग्राहकांना अनेक ऑफर दिल्या जातील. या सेलमध्ये, ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% ची सूट दिली जाईल. 

Sale

या सेलमध्ये, Poco, Apple, Realme, Samsung आणि इतर ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट मिळणार आहे. याशिवाय, स्मार्टवॉच, इयरबड्स, लॅपटॉप यांसारखी इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे 80% पर्यंत सवलतीत उपलब्ध होणार आहे.

Amazon सेल दरम्यान, SBI क्रेडिट कार्ड 10% सूट मिळणार आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच, इअरबड्स आणि इतर उत्पादनेही अतिशय स्वस्तात विकली जातील. यामध्ये तुम्ही एक्सचेंज आणि बँक ऑफर्सचाही लाभ घेऊ शकता.