UP: काँग्रेसची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 50 महिलांना संधी

Uttar Pradesh Election : काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा (UP Election 2022) निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  

Updated: Jan 13, 2022, 01:58 PM IST
UP: काँग्रेसची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 50 महिलांना संधी title=

 लखनऊ : Uttar Pradesh Election : काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा (UP Election 2022) निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या सरचिटणीस आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या प्रमुख उमेदवारांची घोषणा केली आहे.

उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेच्या आईला तिकीट

प्रियंका गांधी म्हणाल्या, 'आमच्या यादीत काही महिला पत्रकार आहेत. काही संघर्षशील महिला आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत, अशा महिला आहेत ज्यांनी खूप अत्याचार सहन केले आहेत. त्यामुळेच आम्ही आमच्या आश्वासनानुसार महिलांना तिकीट दिले आहे. आमच्या पक्षाची उन्नावची उमेदवार उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेची आई आहे. त्यांचा संघर्ष सुरु ठेवण्यासाठी आम्ही त्यांना संधी दिली आहे. ज्या सत्तेच्या माध्यमातून त्यांच्या मुलीवर अत्याचार झाले, तिचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, तीच सत्ता आता तिला मिळाली पाहिजे.

महिला उमेदवारांना पक्ष सर्वतोपरी मदत करेल : प्रियंका गांधी

प्रियंका गांधी म्हणाल्या, 'आम्ही सोनभद्र हत्याकांडातील पीडित रामराज गोंड यांनाही तिकीट दिले आहे. तसेच आशा भगिनींनी कोरोनामध्ये खूप काम केले, पण त्यांना मारहाण झाली. त्यापैकी एक पूनम पांडे यांनाही आम्ही तिकीट दिले आहे. त्याचवेळी, सदफ जाफरने CAA-NRC दरम्यान खूप संघर्ष केला होता. पोस्टरमध्ये त्यांचा फोटो छापून सरकारने त्यांना त्रास दिला. माझा संदेश आहे की जर अत्याचार होत असतील तर आपल्या हक्कासाठी लढा. काँग्रेस अशा महिलांच्या पाठीशी आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या महिला संघर्षशील आणि धाडसी महिला आहेत. काँग्रेस पक्ष त्यांना पूर्ण सहकार्य करेल.

नोएडाहून पंखुरी पाठकची संधी

या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने पंखुरी पाठक यांना नोएडामधून उमेदवारी दिली आहे, तर गुंजन मिश्रा एटामधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. तसेच काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस यांना फारुखाबादमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

'नकारात्मक प्रचार करणार नाही'

आमची भूमिका महत्वाची आहे. ती कशी वाढेल यावर भर राहिल. पक्ष मजबूत झाला पाहिजे, हेच आमचे ध्येय आहे, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या. आम्ही ठरवले आहे की, आम्ही नकारात्मक प्रचार करणार नाही. सकारात्मक मुद्द्यांवर निवडणूक लढवू. राज्याची प्रगती व्हावी यासाठी महिला, दलित, तरुणांच्या प्रश्नांवर निवडणूक लढणार.

काँग्रेस उमेदवारांची यादी

लखनऊ मध्यमधून - सदफ जफर.
रामपूर खास- आराधना मिश्रा.
उन्नाव-उषा सिंह तिकीट.
सोनभद्र-रामराज कोल 
शाहजहांपूर-आशा बहू  
शहाजहानपूर- पूनम पांडे 
खेरी- रितू सिंह.
सीतापूर सदर- समीना शफीक 
मोहनलालगंज-ममता चौधरी.