Aligarh Dog Marriage: देशभरात लग्नाचा (Marriage Story) माहोल सूरू आहे. जागो-जागी ढोल ताशे वाजतायत. या लग्नाच्या मुहूर्तात अनेक तरूण-तरूणी लग्न बंधनात (Marriage)अडकतायत. अशात काही प्राणी देखील मागे राहिले नाही आहेत. प्राण्यांचेही विवाह पार पडत आहेत.अशीच एक अनोखी घटना समोर आली आहे. या घटनेत दोन श्वानांचा लग्न सोहळा पार पडला आहे. या लग्नाची सोशल मीडियावर (Social media) चर्चा रंगली आहे.
आतापर्यंत तुम्ही केवळ धूमधडाक्यात तरूण-तरूणींचे लग्नसोहळे पार पडत असल्याच्या घटना पाहिल्या असतील. पण आजकाल पाळीव कुत्र्यांचे लग्न पार पडत आहेत, तेही धुमधडाक्यात. या घटनेत टॉमी नवरा आणि जेली नवरी या दोघांचे लग्न (Dog Marriage) पार पडले आहेत. या दोघांनी सात फेरे घेऊन ते एकमेकांचे झाले आहेत. या अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या लग्न (Dog Marriage) सोहळ्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
टॉमी हा सुखरावली गावचा माजी प्रमुख दिनेश चौधरी यांचा पाळीव कुत्रा आहे. तर दुसरीकडे, अत्रौलीतील टिकरी रायपूर येथील रहिवासी डॉ. रामप्रकाश सिंह यांची जेली ही पाळीव कुत्री आहे. या दोघांचे लग्न ठरले होते. त्यानुसार 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी टॉमी आणि जेलीचे लग्न (Dog Marriage) पार पडले.
या लग्नात (Dog Marriage) ढोल-ताशांच्या गजरात टॉमीचे फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले होते. जेलीच्या बाजूने आलेल्या लोकांनी टॉमीला टिळा लावला. त्यानंतर टॉमी आणि जेलीच्या लग्नाची तयारी सुरू झाली. ढोलताशांच्या गजरात टॉमीची मिरवणूक निघाली. दरम्यान, टॉमी पुढे चालत होता, तर मिरवणुकीत महिला, पुरुष आणि मुले त्याच्या मागे जोरदार नाचत होते.
#WATCH | A male dog, Tommy and a female dog, Jaily were married off to each other in UP's Aligarh yesterday; attendees danced to the beats of dhol pic.twitter.com/9NXFkzrgpY
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 15, 2023
लग्नात दोन्ही कडच्या (Dog Marriage) पक्षांनी टॉमी आणि जेलीच्या गळ्यात हार घालून आशीर्वाद दिले. त्यानंतर पंडितांना बोलावून टॉमी-जेलीने नामजप करत सात फेरे घेतले. लग्नात पाहुण्यांना देशी तुपापासून बनवलेले पदार्थ खाण्याची मेजवाणी होती. या लग्नात महिलांनी अभिनंदनाचे गीत गायले. त्यानंतर निरोप समारंभ पार पडला. या लग्नासाठी सुमारे 40 ते 45 हजार रुपये खर्च झाल्याचे टॉमीचे मालक दिनेश यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात हा अनोखा विवाह सोहळा (Dog Marriage)पार पडलाय. या विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.