मुलायम सिंग यांचे सुपुत्र अखिलेश यादव हे गुप्तपणे कृष्णाचा 50 फूट उंचीचा तांब्याचा पुतळा उभारत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या विधानाकडे बघितलं जातयं. सैफई येथे हा पुतळा उभारला जातोय.
मुलायम सिंग म्हणाले की, आपल्याला हे स्वीकारावं लागेल की रामाची आराधना ही मुख्यत्वे उत्तर भारतातच केली जाते. परंतु कृष्णाची आराधना ही संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरसुद्धा केली जाते. तुम्ही दक्षिण भारतात गेलात तर कृष्णाची आराधना मोठ्या प्रमाणात केली जाते. रामाची मात्र उत्तर भारतातच मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेसुद्धा अयोध्येत रामाचा 100 फूट उंचीचा पुतळा उभारत आहेत. उत्तर प्रदेशात धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.