NSA Ajit Doval : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (National Security Advisor Ajit Doval) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. पण, त्यांच्या या निर्णयामुळे पाकिस्तान मध्ये खळबळ उडाली आहे. अजित डोवाल अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर बोलावलेल्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रशियाला गेले होते. या बैठकीत चीनसह इतर अनेक देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील उपस्थित होते. मात्र अफगाणिस्तानचा मोठा स्टेकहोल्डर मानणारा पाकिस्तान या बैठकीपासून दूर होता. अफगाणिस्तानचा प्रश्न पाकिस्तानशिवाय सोडवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या बैठकीतील गैरहजेरीमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
अजित डोवाल दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली. या भेटीची पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा आहे. अफगाणिस्तानबाबत चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीला चीनसह इतर अनेक देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी हजेरी लावली होती. पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार मात्र गैरहजर होते.
पाकिस्तानची अफगाणिस्तानातील स्थिती कमकुवत करण्यासलाठी भारताने ही खेळी केली. पाकिस्तानला एकाकी पाडण्याचा हा प्रयत्न आहे. अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी रशियाने बुधवारी राजधानी मॉस्कोमध्ये पाचवी बैठक बोलावली. या बैठकीत चीन, भारत, इराण, ताजिकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तानसह अनेक देशांना बोलावण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानला या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले होते.
अफगाणिस्तानातील लोकांच्या मानवतावादी गरजा पूर्ण करणे ही भारताची पहिली प्राथमिकता आहे. अफगाणिस्तान कठीण काळातून जात आहे आणि या गरजेच्या वेळी भारत कधीही अफगाणिस्तानच्या लोकांची साथ सोडणार नाही असे डोवाल या बैठकीत म्हणाले. भारताने 40,000 मेट्रिक टन गहू, 60 टन औषधे आणि पाच लाख कोविड लस पाठवून अफगाणिस्तानला मदत केली आहे.
भारताने यंदाच्या अर्थसंकल्पात अफगाणिस्तानसाठी विशेष आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे. अफगाणिस्तानमधील विकासकामांसाठी भारत 25 दशलक्ष डॉलर्सची मदत करणार आहे. अफगाणिस्तानबाबत भारताच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे.