अवघ्या २३९९ रूपयात करा परदेशात विमानप्रवास

अवघ्या काही दिवसांमध्ये सुट्ट्यांचा काळ सुरू होतोय.  

Updated: Oct 2, 2017, 01:38 PM IST
अवघ्या २३९९ रूपयात करा परदेशात विमानप्रवास  title=

मुंबई : अवघ्या काही दिवसांमध्ये सुट्ट्यांचा काळ सुरू होतोय.  

तुम्हीही या दिवसांमध्ये देशा-परदेशात एखादी सहल प्लॅन करत असाल तर एअर एशिया तुम्हांला अगदी आवाक्यात असणार्‍या किंमतीत विमान प्रवास करण्याची संधी देत आहे. 
 
 देशांर्तगत विमानप्रवास  १२९९ तर आंतरराष्ट्रिय विमानप्रवास २३९९ रूपयांमध्ये करणं शक्य आहे. एअर एशियाने त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर या खास ऑफरची माहिती दिली आहे. आज २ ऑक्टोबरपासून १५ ऑक्टोबरपर्यंत ही बुकींग सेवा उपलब्ध रहाणार आहे. या ऑफरनुसार तुम्ही २ ऑकतोबर ते ३१ मार्च पर्यतची तिकीटं बुक करू शकाल. एअर एशियाच्या वेबसाईटवर ही बुकिंग सुविधा उपलब्ध आहे.  

येत्या काही महिन्यात एअर एशिया काही नव्या विमान सेवा सुरू करणार आहे. यामध्ये रांची ते बंगळूर, हैदराबाद आणि भुवनेश्वर दरम्यान विमानसेवा सुरू होईल. तसेच एअर एशियाच्या ताफ्यात आता एयरबस ए320 हे विमानदेखील दाखल झाले आहे.