नवी दिल्ली : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी दौऱ्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्याबाबत अमेठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्रकच काढले आहे. त्यात त्यांनी राहुल गांधी यांच्या अमेठी दौऱ्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याचे वृत्त फेटाळले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा दौरा प्रशासनाने रद्द केल्याचे वृत्त निराधार आहे. आम्ही त्यांचा दौऱा रद्द केला नव्हता तर, केवळ त्यांना सल्ला दिला होता. त्यांनी ५ ऑक्टोबरच्या ऐवजी इतर तारखेला आपल्या दौऱ्याची आखणी करावी असे आम्ही म्हटले होते. त्यात त्यांनी दौरा रद्द करावा असे कधीही म्हटले नव्हते, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, प्रशासनाने दौऱ्याला परवानगी नाकारण्यासाठी दिलेल्या कारणावरून कॉंग्रेस नाराज होती. कॉंग्रेसचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी या पार्श्वभूमीवर मत प्रतिक्रीया देताना प्रशासनाचे हे सर्व बहाने आहेत. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे सण उत्सवाच्या काळात. एका खासदाराला त्याच्या मतदारसंघात प्रवेश नाकारला जातो. ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले होते.