पाहा फोटोत ओवेसींचे हल्लेखोर? नेमकं काय आहे प्रकरण? 'त्या' व्हिडीओनं अखेर सत्य समोर

ओवीसींवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा फोटो समोर, कोणी केला हल्ला? नेमकं काय आहे प्रकरण? त्या व्हिडीओनं अखेर सत्य समोर

Updated: Feb 4, 2022, 06:51 PM IST
पाहा फोटोत ओवेसींचे हल्लेखोर? नेमकं काय आहे प्रकरण? 'त्या' व्हिडीओनं अखेर सत्य समोर title=

मेरठ : एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ला झाला. यामध्ये ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. या घटनेनंतर ओवेसी यांनी जिथे हा सुनियोजित कट असल्याचा दावा केला आहे. 

ओवेसींच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी तातडीनं अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी ओवेसींच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या चौकशीत हल्लेखोर पोपटासारखा बोलू लागला. त्याने हल्ल्यामागील कारण सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला करणारे दोन्ही आरोपी लॉ ग्रॅज्युएट आहेत. 

दोन्ही हल्लेखोर खूप चांगले मित्र आहेत. एका कॉलेजमध्ये शिकत आहेत. दोन्ही आरोपी ओवेसी यांची सर्व भाषणं ऐकायचे. ओवेसी यांच्या भावाने दिलेल्या भाषणातील एक मुद्दा वादग्रस्त होता. पोलिसांना हटवा मग आम्ही दाखवून देऊ असं या भाषणात उल्लेख केला होता.

त्या वक्तव्याने दोघांना राग अनावर झाला आणि त्यांनी हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांची अजूनही आरोपींकडून चौकशी सुरू आहे. चौकशीत आरोपी सचिन हा बदलपूरचा तर शुभम हा सहारनपूरचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे.