नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या कामांचा धडाका लावला होता. तसेच अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन कामाचे भूमीपूजनही केलं आहे.
गुजरातमध्ये कोणाची सत्ता येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपचं वर्चस्व गुजरातमध्ये कमी झाल्याचं बोललं जातं आहे. जीएसटी, नोटबंदीबाबत व्यापारी वर्ग नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे. पण नुकताच एका हिंदी न्यूज चॅनेलने केलेल्या सर्वेमध्ये असं समोर आलं आहे की गुजरातमधील लोकांची विश्वास अजूनही पंतप्रधान मोदींवर आहे. पाटीदा, ओबीसी, ठाकुर, दलित समाज भाजपवर नाराज असल्याचं देखील बोललं जातंय. पण लोकांमध्ये मोदींबाबत विश्वास काय दिसतोय.
ओपिनियम पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला ११५ ते १२५ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ५७ ते ६५ जागा मिळण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये फक्त मोदीच मोदींचा पराभव करु शकतात अशा देखील लोकांच्या भावना आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात निवडणुकीत काय होतं याबाबत उत्सूकता कायम आहे.