#ManoharParrikar : बॉलिवूडकरांकडून पर्रिकरांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त

१९९४ साली सुरू झालेला त्यांचा प्रवास रविवारी अखेरचा संपला.

Updated: Mar 18, 2019, 10:55 AM IST
#ManoharParrikar : बॉलिवूडकरांकडून पर्रिकरांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त title=

मुंबई : गोव्याचे मुख्यंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. स्वदूपिंडाच्या कर्करोगाला झुंज देत त्यांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासा पर्यंत फक्त देशसेवाच केली. राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा हा नेता आज आपल्यात नसल्याचे दुख: देशाच्या कान्या - कोपऱ्यातून व्यक्त होताना दिसत आहे. १९९४ साली सुरू झालेला त्यांचा प्रवास रविवारी अखेरचा संपला. गोव्याचे मुख्यमंत्री भुषवल्यानंतर पर्रिकर यांनी गोव्याला प्रामाणिक आणि पारदर्शक सरकार दिले. 

वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी पणजी येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातच नाही तर कला - क्रिडा क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे. देशाने एक साधा, सच्चा आणि स्वच्छ चारित्र्याचा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाबद्दल बॉलिवूडकरांनी शोक व्यक्त केला आहे. जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुख: व्यक्त केले. ते म्हणाले, 'नेहमी चेहऱ्यावर स्मित हस्य असणारा हा नेता काळाच्या पडद्या गेला. अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक स्वभावाचा नेता देशाने गमावला आहे.' त्यांनी ट्विटरवर पर्रिकरांसोबत असलेले काही फोटो ही शेअर केले आहे. 

अमिताभ बच्चन यांच्या सोबतच अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर आज एक दिवसाचा तर गोव्यात सात दिवसांचा दुखवटा जाहिर केला.