नवी दिल्ली: बिहारमध्ये एकाच कुटुंबातल्या सोळा जणांवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. छेडछाडीला विरोध केल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे समजते. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडलीय. बुधवारी सकाळी काही लोक नंदकिशोर भगत यांच्या घरात घुसले आणि त्यांनी कुटुंबातल्या सगळ्यांवर अॅसिड हल्ला केला.
जखमींमध्ये रूपा कुमारी, जयप्रकाश सिंह, चंद्रकला देवी, रविंद्र भगत, देवेंद्र भगत, गुडिया देवी, मनोज भगत, अनिल भगत, नवल किशोर सिंह, पिंटू भगत, अर्जुन कुमार, रोशन कुमार, महेश साह, रामानंद भगत यांचा समावेश आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.
Bihar: 13 people including 3 women attacked with acid after a fight erupted between two groups in Vaishali's Daudnagar. Raghav Dayal, SDPO says, "People of one group attacked the other with acid. The injured are being treated at a local hospital.5 people arrested; probe underway" pic.twitter.com/tf3uZThaAn
— ANI (@ANI) August 28, 2019
भगत कुटुंबातील तरुणीची गावातल्या काही तरुणांकडून वारंवार छेड काढली जात होती. याला विरोध केला असता भगत कुटुंबीयांवर अॅसिड हल्ला करण्यात आला. या अॅसिड हल्ल्यात आठ जण जखमी झाले असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपींमध्ये बालेश्वर शर्मा आणि लखिंद्र शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्याचा समावेश आहे.