झोपडीत झोपलेल्यांवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू

धक्कादायक... त्यांना माहिती नव्हतं त्यांची ही शेवटची रात्र असेल...

Updated: Aug 9, 2021, 09:26 AM IST
झोपडीत झोपलेल्यांवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू title=

सूरत : गुजरातच्या अमरेली भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे 9 निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार सावरकुंडलमधील बाढडा गावाजवळ एका भरधाव वेगात आलेल्या ट्रकने झोपडीला धडक दिली. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा झोपडीमध्ये लोक गाढ झोपत होती. या दुर्घटनेत 9 जणांचे प्राण गेले आहेत. 

तर काही जण गंभीर जखमी आहेत. या घटनेनंतर परिसरात एकचं खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित घटना रात्री 3 वाजता  घडली आहे. या दुर्घटनेत जखमी आणि मृतांना जवळच्या सिव्हील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रूग्णालयात सध्या 4 जणांवर उपचार सुरू आहेत. 

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरचा स्टेयरिंग व्हिलवरचं नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताचं 108 जणांती टिम जखमींची मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचली.