मुंबई : सेंसेक्सच्या फ्रंटलाईन टॉप 10 मधील 9 कंपन्यांच्या बाजार भांडवलात (Market Cap) गेल्या आठवड्यात तब्बल 2 लाख 22 कोटींची वाढ झाली आहे. यात सर्वाधिक फायदा रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कंन्सल्टेंन्सी(TCS), HDFC Bank आणि HDFCला झाला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात BSE चा 30 शेअर्सचा सेंसेक्स 1690.88 अंक या 3.21 टक्क्यांच्या फायद्यात आहे. 5 ऑगस्ट रोजी सेंसेक्स 54 हजार 717 अंकांच्या आपल्या सर्वात उच्चांकी पातळीवर पोहचला होता. (Top-10 companies in India)
या कंपन्यांची मार्केट कॅप वाढली
गेल्या आठवड्यातील बाजाराचे परीक्षण केल्यानंतर दिसून येते की, बजाज फायनान्स सोडून मार्केटच्या टॉप 10 कंपन्यांच्या मार्केट वॅल्युएशनमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिवर लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, भारतीय स्टेट बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे भांडवल वाढले आहे.
गेल्या आठवड्यात टीसीएसचे मार्केट वॅल्युएशन 52 हजार कोटीवरून वाढून 12 लाख 24 हजार कोटीवर पोहचले आहे. एचडीएफसी बँकेचे 37हजार कोटीवरून 8 लाख 26 हजार कोटींवर पोहचले आहे.