shocking news : लग्नाची वरात मंडपाऐवजी थेट स्मशानात पोहचली; नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू

लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. नवरदेवाच्या मृत्यूचे वृत्त समजताच नवरीसह तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. लग्न मंडपात शोककळा पसरली. 

Updated: Feb 18, 2023, 09:02 PM IST
shocking news : लग्नाची वरात मंडपाऐवजी  थेट स्मशानात पोहचली; नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू   title=

Shocking accident : लग्न सोहळा (wedding ceremony ) म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. मात्र, आनंदाचा क्षण अनुभवण्याआधीच धक्कादायक प्रकार घडला आहे. नवरदेवाची वरात  लग्नमंडपात पोहचण्याऐवजी थेट स्मशानात पोहचली आहे. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) ही विचित्र घटना घडली आहे. या घटनेत नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे (Five people including the groom died in the acciden). 

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात, पाचदेवरा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. बोलोरो कार कालव्यात पडून हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेमुळे लग्न सोहळ्याच्या आनंदावर दुख:ची छाया पडली. एक क्षणात होत्याच नव्हत झाले.

शुक्रवारी हरदोईच्या हरपालपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुडा गावातील रहिवासी असलेल्या ओमवीर यांचा मुलगा देवेश याचा विवाह सोहळा होता. शाहजहानपूरच्या कात गावात राहणाऱ्या नवरीमुलीच्या घरी हा विवाह सोहळा पार पडणार होता. यासाठी नवरदेवाकडील   वऱ्हाड कात गावाकडे निघाले होते. यावेळी वाटतेच नवरदेवाच्या बेलोरो कारला भयानक अपघात झाला. 

बोलोरो कार भरधाव वेगाने निघाली होती. यावेळी चालकाला मध्येच ऊसाने भरलेल्या ट्रक दिसला. या ट्रकला धडक होऊ नये यासाठी चालकाने प्रयत्न केला. मात्र, ट्रकची धडक चुकवण्याच्या प्रयत्नात बोलोरो कार थेट कालव्यात पडली.  या कारमध्ये नवरदेवासह त्याचे आणखी काही नातेवाईक बसले होते.

या अपघातात नवरदेवासह त्याच्या पाच नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका 12 वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  नवरदेवाच्या कारला अपघात झाल्याचे समजताच नवरीसह तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. लग्न मंडपात शोककळा पसरली.