Viral Resignation Letter : कर्मचाऱ्याचा नादचं खुळा! फक्त 4 शब्द लिहून दिला राजीनामा

Resignation Letter Viral on social media : गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक कंपन्या नोकरकपात (job cuts)करताय. अनेक बड्य़ा कंपन्यानी 500, 800 च्या घरात कर्मचाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रात आली होती. अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीच्या या निर्णयाचा धक्का बसला आहे. 

Updated: Feb 18, 2023, 08:32 PM IST
Viral Resignation Letter : कर्मचाऱ्याचा नादचं खुळा! फक्त 4 शब्द लिहून दिला राजीनामा  title=

Resignation Letter Viral on social media : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून नागरीकांचे मनोरंजन होत असते. असाच मनोरंजन करणारा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो एका कर्मचाऱ्याच्या राजीनामा पत्राचा (Resignation Letter Viral) आहे. नेमकं या राजीनामा पत्रात कर्मचाऱ्याने असं काय लिहलं आहे की, इतर कर्मचाऱ्यांना हसू अनावर होत आहे. चला जाणून घेऊयात. 

गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक कंपन्या नोकरकपात (job cuts)करताय. अनेक बड्य़ा कंपन्यानी 500, 800 च्या घरात कर्मचाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रात आली होती. अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीच्या या निर्णयाचा धक्का बसला आहे. अनेक कर्मचाऱ्यांवर कर्जाचा डोंगर होता. त्यात कंपनीने त्यांना कामावरून काढून टाकल्याने त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. मात्र अशात काही कर्मचारी असे देखील असतात जे कंपनीलाच धडा शिकवत असतात. अशीच ही घटना आहे. 

राजीनामा पत्रात काय?

एका कर्मचाऱ्याने कंपनीला सर्वांत छोट राजीनामा पत्र (Resignation Letter Viral) लिहून कंपनी सोडली आहे. या कर्मचाऱ्याने लेटर मध्ये आदराने डिअर सर लिहले आणि खाली 'मजा नही आ रहा!' असे चार शब्द इंग्रजीत लिहली आहेत. या शब्दाचा अर्थ म्हणजे काम करण्यास मजा येत नाही, म्हणून काम सोडत असल्याचे कारण कर्मचाऱ्याने दिले आहे. शेवटी त्याने आपला विश्वासू कर्मचारी लिहत राजीनामा पत्राचा (Resignation Letter Viral) शेवट केला आहे. आतापर्यंतचे हे सर्वात लहान राजीनामा पत्र आहे. या राजीनामापत्राची सोशल मीडियावर चर्चा आहे.

या राजीनामा पत्राची (Resignation Letter Viral) विशेषता म्हणजे, या कर्मचाऱ्याने फक्त 4 शब्द लिहून राजीनामा दिला आहे. त्यात ही त्याचे कारण कदाचित कंपनीला पटणार नाही आहे. तसेच  एखाद्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या बॉसचे आभार मानण्यासाठी मोठे पत्र लिहतो. मात्र या कर्मचाऱ्याने तर ती कसर सोडली नाही. त्याने ना कंपनीने दिलेल्या संधीचे आभार मानले, ना बॉसवर कौतूकाचा वर्षाव केला.त्याने थेट चार शब्द लिहून राजीनामा देऊन टाकला. 

दरम्यान या राजीनाम्याची (Resignation Letter Viral) सोशल मीडियावर चर्चा आहे. या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. तसेच अनेक कर्मचारी स्वत;चा राजीनाम्याचा अनुभवही शेअर करताना दिसत आहे.