पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना लाभ

पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने  (पी.एम.ओ.) दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या योजने अंतर्गत तब्बल ७,७०० कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 21, 2017, 10:01 PM IST
पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना लाभ title=

नवी दिल्ली : पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने  (पी.एम.ओ.) दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या योजने अंतर्गत तब्बल ७,७०० कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.

बैठकी दरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, या योजनेचा थेट किती शेतकऱ्यांना फायदा झाला हे जाणून घेण्यासाठी  स्मार्टफोन, इंटरनेट, गुगल, अत्याधूनिक तंत्राचा वापर केला जात आहे. यासाठी डिजीटल पर्यायाचाही चांगला फायदा होत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.