मुंबई : Harbhajan Singh Big decision : क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता हरभजन सिंग (Harbhajan Singh) राजकारणात सक्रीय झाला आहे. आम आदमी पक्षाकडून राज्यसभा खासदार म्हणून हजभजन याची नियुक्ती झाली आहे. खासदार झाल्यानंतर हरभजन याने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसभेचा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी देण्याची घोषणा त्याने केली आहे.
देशाच्या भल्यासाठी आपले योगदान द्यायचे आहे असे सांगून, माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांने 16 एप्रिल रोजी जाहीर केले की, तो आपला राज्यसभेचा पगार शेतकरी मुलींच्या शिक्षण आणि कल्याणासाठी दान करणार आहे. हरभजन याने ट्विट केले की, राज्यसभा सदस्य या नात्याने, मी शेतकऱ्यांच्या मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी माझा राज्यसभेचा पगार देऊ इच्छितो. देशाच्या भल्यासाठी आपण राज्यसभेत गेलो आहोत आणि त्यासाठी जे काही करता येईल ते करु.
राज्यसभा सदस्य म्हणून मी माझा राज्यसभेचा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी देत आहे. आपला देश अधिक चांगला व्हावा यासाठी मला योगदान द्यायचे आहे. मी जे काही करु शकतो ते करण्यावर माझा भर असले, असे हरभजन सिंग यांनी म्हटले आहे.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग हा पंजाबमधून आम आदमी पक्षाकडून यावर्षी मार्चमध्ये राज्यसभा सदस्य म्हणून नामांकन केले होते. त्यांची बिनविरोध निवड झाली. क्रिकेटमधून राजकारणात आलेला हरभजन सिंग याने नुकताच एक निर्णय जाहीर केला आहे. हरभजन सिंग याने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेतकरी बांधवांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशातील अन्य खासदारांनी देखील असा आदर्श घेतला तर लाखो शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, अशी चर्चा सध्या आहे.