आनंद महिंद्रांनी शोधला बुटांचा डॉक्टर, अशी करणार मदत

आनंद महिंद्रा या मोचीपासून खूप प्रभावीत झाले. याला मदत करायची आहे अस त्यांनी लिहिल आणि त्यांच्या टीमने त्या मोचीचा पत्तादेखील शोधून काढला. 

Updated: Apr 30, 2018, 11:16 PM IST
आनंद महिंद्रांनी शोधला बुटांचा डॉक्टर, अशी करणार मदत  title=

नवी दिल्ली : सोशल मीडियावर अॅक्टीव्ह राहणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपुर्वी एक फोटो शेयर करत म्हटले या व्यक्तिकडुन मॅनजमेंटच्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंटचे गुण शिकायला हवेत. महिंद्रा ग्रुपच्या चेयरमननी जो फोटो शेयर केला त्यामध्ये एका मोचीने रस्त्यावरच्या आपल्या दुकानावर बॅनर लावलाय त्यावर लिहिलय, 'जख्मी जूतों का हस्पताल'. एखाद्या हॉस्पीटलप्रमाणे बॅनरवर लंच टाइमपासून सर्व माहिती लिहिली आहे. आनंद महिंद्रा या मोचीपासून खूप प्रभावीत झाले. याला मदत करायची आहे अस त्यांनी लिहिल आणि त्यांच्या टीमने त्या मोचीचा पत्तादेखील शोधून काढला. नरसीराम असं त्या मोचीच नाव आहे. आनंद महिंद्रा यांनी पुन्हा ट्विट करत लिहिले, आमच्या टीमने हरियाणामध्ये जाऊन तुम्हाला आम्ही काय मदत करु शकतो ? असं विचारलं, तेव्हा त्यांनी पैसे न मागता अत्यंत नम्रपणे काम करण्यासाठी चांगली जागा हवीए, अस सांगितलं. यानंतर महिंद्रा यांनी आपल्या डिझाइन टीमला एक चालती फिरती दुकान बनवायला सांगितली. आमच्या टीमने ही डिझाइन नरसीजींना दाखविल्याचे ट्विटही त्यांनी केलं. त्यांनी ट्विटर युजर्सकडेही आयडिया मागितल्या.

नरसीराम याच्याविषयी...

नरसीमराम हरियाणातील जींदच्या पटियाला चौकात चप्पल-बुट ठिक करतात. लोकांच लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी बॅनर लावलाय.

त्यावर जख्मी बुट ठिक करण्याच हॉस्पीटस डॉ.नरसीराम | असं लिहिलं. ओपीडी सकाळी ९ ते १ वा., लंच दु १ ते २ आणि दु. २ ते ६ वा. पर्यंत हॉस्पीटल सुरू असेल अस लिहिलं. आमच्या इथे सर्व प्रकारची बुट जर्मन पद्धतीने ठिक केली जातात असेही त्याखाली लिहिले. नरसीमराम याचा फोटो व्हाट्सअॅपद्वारे महिंद्रा ग्रुप चेअरमन आनंद महिंद्रा यांना दिसला. हा फोटो ट्विट करत या व्यक्तीला आयआयएममधल्या टीचिंग फॅकल्टीमधअये असायला हवं असं लिहिलं.