आधार कार्डचा डेटा सुरक्षितच - युआयडीएआय

आधार कार्डबाबत ज्या काही बातम्या आणि वृत्त येत आहेत, ती सर्व निधारात आणि चुकीची आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 24, 2018, 11:22 PM IST
आधार कार्डचा डेटा सुरक्षितच - युआयडीएआय title=

नवी दिल्ली : आधार कार्डबाबत ज्या काही बातम्या आणि वृत्त येत आहेत, ती सर्व निधारात आणि चुकीची आहेत. आधारचा डेटा सुरक्षितच आहे, असा पुन्हा एकदा दावा युआयडीएआयने केलाय. दरम्यान, आधारशी संबंधित सगळी गोपनीय माहिती आणि डेटा यांची चोरी झालेली नाही, असे युआयडीएआयने स्पष्ट केले.

आधार कार्डांचा गोपनीय डेटा लीक झाल्याच्या मध्यंतरी ज्या काही बातम्या आल्या त्या सगळ्या निराधार आहेत. सर्वांची आधार कार्ड सुरक्षित आहेत, असे युआयडीएआयने म्हटले आहे. आधारची सर्व गोपनीय माहिती आणि डेटा यांची चोरी झालेली नाही. मात्र, ज्यांनी हे वृत्त दिले ते संपूर्ण चुकीचे आहे. 

ZDNet या ऑनलाइन पोर्टलने आधार कार्डशी संबंधित महत्त्वाची गोपनीय माहिती चोरीला गेल्याचे म्हटले होते. अनेक आधार कार्डांची माहिती यामुळे सार्वजनिक झाली आहे, असाही दावा करण्यात आला होता. मात्र, तो चुकीचा आहे. आधारची सगळी माहिती सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारची चोरी झालेली नाही, असे युआयडीएआयने म्हटलेय. 

ज्या पोर्टलचा हवाला देऊन ज्या बातम्या देण्यात आल्या आहेत, त्या चुकीचा आहेत. शिवाय याला काही आधार नाही, असेही युआयडीएआयने म्हटलेय. जर सरकारी कंपनीत तंत्रज्ञानाचा अभाव आहे, तर लाखो आधार कार्डांचा डेटा चोरीला गेला असता. मात्र तसे घडलेले नाही. त्यामुळे निराधार वृत्तावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे युआयडीएआयने आवाहन केलेय.