नीट आणि सीबीएसई परीक्षार्थींना न्यायालयाचा मोठा दिलासा

सर्वोच्च न्यायलयानं नीट आणि सीबीएसई परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 8, 2018, 10:27 AM IST
नीट आणि सीबीएसई परीक्षार्थींना न्यायालयाचा मोठा दिलासा title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायलयानं नीट आणि सीबीएसई परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय. 

नीट परीक्षेचा अर्ज भरताना आधार क्रमांक बंधनकारक न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं संबंधित प्रशासनाला दिले आहेत. सीबीएसईनं ही माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसारित करण्याचे निर्देशही सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या नेतृत्वातल्या पाच न्यायाधिशांच्या पीठानं दिले आहेत. 

आधार क्रमांक बंधनकारक करण्यासंदर्भात सीबीएसईला कोणतेही अधिकार दिले नसल्याचं केंद्र सरकारनंही न्यायालयात स्पष्ट केलंय.