खुशखबर ! केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ

केंद्रीय कर्मचा-यांसाठी खूशखबर....केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आलीय.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 8, 2018, 08:29 AM IST
खुशखबर ! केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ title=

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचा-यांसाठी खूशखबर....केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आलीय.

महागाई भत्ता वाढवला

केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता ५ टक्क्यांवरून ७ टक्के करण्यात आलाय. निवृत्त कर्माचा-यांनाही या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. वाढीव डीए १ जानेवारी २०१८ पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्यात येणार आहे. 

किती कर्मचा-यांना होणार फायदा

केंद्र सरकारच्या ४९ लाख कर्मचा-यांना आणि ६२ लाख निवृत्तीधारकांना याचा लाभ होणार आहे. वाढीत महागाई भत्त्यामुळे केंद्र सरकारवर ६ हजार ७७ कोटींचा बोजा पडणार आहे. 

राज्यात सातवा वेतन आयोग

दरम्यान, लवकरच राज्य सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. या संदर्भातला के पी बक्षी यांचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितले. कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यास राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे २१ हजार ५३० कोटी रुपयांचा बोझा पडणार आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण

‘अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे. परंतु यासंदर्भात नेमलेल्या बक्षी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. कर्मचा-यांना त्यांच्या वेतनश्रेणीबाबत १५ मार्चपर्यंत अभिप्राय नोंदवता येतील. सातव्या वेतन आयोगामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी २१ हजार ५३० कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील महिला कर्मचारी व पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचा-यांना संपूर्ण सेवाकालावधीत काही अटी व शर्तींच्या अधीन राहून बालसंगोपन रजा देण्याबाबत शासन विचार करत आहे’, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.