'मी या पोरांचा बाप नाही,' नवऱ्याचे 'ते' शब्द ऐकताच पत्नीने नवजात जुळ्या मुलांना उचललं अन्....; सगळेच हादरले

स्थानिकांना सुरुवातीला बापानेच आपल्या मुलांची हत्या केली असा संशय वाटत होता. पण पोलिसांनी मुलांच्या आईची चौकशी केली असता तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.   

शिवराज यादव | Updated: Jul 11, 2024, 08:31 PM IST
'मी या पोरांचा बाप नाही,' नवऱ्याचे 'ते' शब्द ऐकताच पत्नीने नवजात जुळ्या मुलांना उचललं अन्....; सगळेच हादरले  title=

जम्मू काश्मीरमधील पुँछ जिल्हा धक्कादायक घटनेने हादरला आहे. येथे जुळ्या मुलांची त्यांच्याच आईने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. महिलेने दोन्ही मुलांची गळा कापून हत्या केली. पतीने ही मुलं आपली नाहीत सांगत पालकत्व स्विकारण्यास नकार दिल्याने महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनंतर सगळेच हादरले असून, दुसरीकडे शोककळाही पसरली आहे. 

महिलेचा पती सौदी अरेबियात कामाला आहे. तीन महिन्यांपूर्वी तो घऱी परतला होता. बऱ्याच काळानंतर तो घरी आला होता. दरम्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. ही मुलं आपली नसून पत्नीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्माला आल्याचा दावा त्याने केला. यानंतर महिला घाबरली होती. तिने जुळ्या मुलांना जवळच्या शेतात नेलं आणि तिथेच त्यांना ठार केलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

नवजात मुलांची हत्या झाल्यानंतर स्थानिकांना यामध्ये पतीचाच हात असावा अशी शंका होता. पण पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पूँछचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक योगुल मन्हास यांनी सांगितलं आहे की, "आईनेच तिच्या जुळ्या मुलींची हत्या केली. तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे".

या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिकांनी महिलेला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. दिल्लीतील एका व्यक्तीने आपल्या नवजात मुलींना ठार मारून शहराच्या सुलतानपुरी भागात त्याच्या घराजवळ पुरल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. 32 वर्षीय वडील मुलासाठी हताश होते. याच नैराश्यातून त्याने हे कृत्य केलं होतं.