भारतात नव्या कोरोनाचे २० जण बाधित, युकेमधून येणारी विमान सेवा रद्द

ब्रिटनमधून आलेल्यापैंकी २० जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. (A total of 20 UK returnees to India have tested positive for the new ‘more infectious’ strain of COVID-19)  

Updated: Dec 30, 2020, 11:51 AM IST
भारतात नव्या कोरोनाचे २० जण बाधित, युकेमधून येणारी विमान सेवा रद्द  title=

नवी दिल्ली : ब्रिटनमधून आलेल्यापैंकी २० जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. (A total of 20 UK returnees to India have tested positive for the new ‘more infectious’ strain of COVID-19) नव्या कोरोनाचा शिरकाव होत असल्याने सात जानेवारीपर्यंत युकेमधून येणारी विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. आधी पाच जानेवारीपर्यंत ही विमान सेवारद्द केली होती. नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय केंद्रीय नागरी उड्ड्यण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी माहिती दिली.

देशावर नव्या कोरोनाचं सावट दिसून येत आहे. ब्रिटनहून आलेल्या २० जणांना नव्या कोरोनाची लागण झाली आहे. (20 UK returnees to India test positive) नव्या कोरोनाग्रस्तांची विलगीकरणात रवानगी करण्यात आली आहे. भारत-ब्रिटन विमानसेवा ७ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. जगभरात कोरोना व्हायरसचं संकट कमी होत असतानाच कोरोना व्हायरसमध्ये बदल होऊन नवीन स्ट्रेनचा प्रसार होऊ लागला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात नवा कोरोना व्हायरस दाखल झाला आहे. लंडनमधून परतलेल्या मेरठ मधील २ वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीत मुलीचे सॅम्पल चाचणीसाठी पाठवल्यानंतर तिला नव्या कोरोनाची लागण झल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर अवघ्या १३ मिनिटांत कोरोना चाचणीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा बराचसा वेळ वाचत आहे. एका आंतरराष्ट्रीय खासगी कंपनीच्या मदतीने ही सुविधा सुरू झालीय. चाचणीसाठी प्रवाशांना ४ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीची सुविधाही आहे. 

तर दुसरीकडे प्रजासित्ताक दिन परेडला कोरोनाचा फटका बसला आहे. यावर्षी विजय चौकापासून नॅशनल स्टेडियमपर्यंत केवळ ३.३ किलोमीटर लांबीची परेड होणार आहे. तसेच परेडला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची संख्या १ लाख १५ हजारावरून २५ हजारापर्यंत घटवण्यात आली आहे. प्रत्येक चमूमध्ये १४४ ऐवजी केवळ ९६ सजस्य असतील. परेडमध्ये पंधरा वर्षाखालील लहान मुलांना सहभागी होता येणार नाही. शाळकरी मुले, दिव्यांगांना जवळून परेड पाहण्यासाठी व्यवस्था नसेल.