New Coronavirus Strain : नव्या कोरोना स्ट्रेनची उत्तर प्रदेशात एन्ट्री

२ वर्षांच्या चिमुरडीला नव्या कोरोना व्हायरसची     

Updated: Dec 30, 2020, 09:15 AM IST
New Coronavirus Strain : नव्या कोरोना स्ट्रेनची उत्तर प्रदेशात एन्ट्री title=

नवी दिल्ली : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. आता भारतात देखील नव्या कोरोना व्हायरसने एन्ट्री केली आहे.  जगभरात कोरोना व्हायरसचं संकट कमी होत असतानाच कोरोना व्हायरसमध्ये बदल होऊन नवीन स्ट्रेनचा प्रसार होऊ लागला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात नवा कोरोना व्हायरस दाखल झाला आहे. लंडनमधून परतलेल्या मेरठ मधील २ वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीत मुलीचे सॅम्पल चाचणीसाठी पाठवल्यानंतर तिला नव्या कोरोनाची लागण झल्याचं समोर आलं.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील एक कुटुंब नुकताच लंडनमधून राज्यात परतलं होतं. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी केल्यानंतर आई-वडिलांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले. तर २ वर्षाच्या मुलीला मात्र नव्या कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे आता राज्यात नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. 

कोरोनाचा नवीन स्ट्रेन जगातील सोळा देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात कोरोना व्हायरसचं संकट कमी होत असतानाच कोरोना व्हायरसमध्ये बदल होऊन नवीन स्ट्रेनचा प्रसार होऊ लागला आहे. ब्रिटनमध्ये या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले. 

या प्रकारचा व्हायरसचा प्रसार वेगानं होत असल्याची माहिती समोर आली. यामुळे सर्वांच्या चिंतेत वाढ होते तोच कोरोनाचा आणखी दुसरा प्रकारही ब्रिटनमध्ये आढळून आला. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.