मुंबई : कोरोना महामारीने (Coronavirus) संपूर्ण देशाला अस्त-व्यस्त केलं आहे. एका बाजूला सरकार संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) ते विकेंड कर्फ्यू (Weekend Curfew) आणि आरोग्य सुरक्षा सप्ताह (Health safety week) या उपायांनी महामारीशी लढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र फक्त सरकारने विचार करून चालणार नाही. (A Toddler On One Shoulder, Vaccines On Other, Photo Of Jharkhand Healthcare Worker Goes Viral) लोकांनी देखील स्वतःहून कोरोना व्हॅक्सीन घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून महामारीशी दोन हात करायला हवेत.
या सगळ्यात आरोग्य कर्मचारी कठीण परिस्थितीतही सामान्यांसाठी झटत आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. हल्लीच एका महिला कोरोना यौद्धाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Image of the day pic.twitter.com/nL9FInBP3E
— Yogendra Yadav (@_YogendraYadav) June 21, 2021
ही महिला आपल्या पाठीवर चिमुकल्या बाळाला बांधून नदी पार करताना दिसत आहे. ही महिला नदीच्या पलिकडे असलेल्या गावात जाऊन कोरोना संबंधित जागरूकता निर्माण करण्याचं काम करत आहे.
हा फोटो झारखंडमधील आरोग्य कर्मचारी मानती कुमारी हीचा आहे. गेल्या काही दिवसांपासून मानती यांचा फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपलं कर्तव्य बजावत असताना महिलेने आपल्या चिमुकल्या बाळाला पाठीवर बांधून नदी पार करण्याची जोखीम उचलली आहे.
Image of the day pic.twitter.com/nL9FInBP3E
— Yogendra Yadav (@_YogendraYadav) June 21, 2021
महिलेने बुढा नदी पार करून तिसिया, गोयरा आणि सुगाबांध या गावात जाऊन मुलांचं लसीकरण करते. मानतीचा हा फोटो सोशल मीडियावर आला तेव्हा तो अवघ्या काही वेळात व्हायरल झाला. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल झाला आहे. कोरोना यौद्धा ठरलेल्या या महिलेचं भरपूर कौतु होत आहे. या व्हिडिओ आणि फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.