VIDEO: काय रे देवा! मेट्रोमध्ये नको ती स्टंटबाजी, दरवाजा उघडला आणि थेट...

Metro Video: सोशल मीडियामुळे नाही नाही तर रिल्स बनवणं त्याचसोबत अजून आकर्षक स्टंटबाजी करत आपले फोलोवर्स वाढविण्यासाठी हटके रिल्स (Trending Reels) तयार करण्याकडे आजकालच्या तरूण तरूणींचा ओढा वाढायला लागला आहे. 

Updated: Jan 22, 2023, 05:31 PM IST
VIDEO: काय रे देवा! मेट्रोमध्ये नको ती स्टंटबाजी, दरवाजा उघडला आणि थेट...  title=

Metro Video: सोशल मीडियामुळे नाही नाही तर रिल्स बनवणं त्याचसोबत अजून आकर्षक स्टंटबाजी करत आपले फोलोवर्स वाढविण्यासाठी हटके रिल्स (Trending Reels) तयार करण्याकडे आजकालच्या तरूण तरूणींचा ओढा वाढायला लागला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपल्या जीवाची पर्वा न करता स्टंटबाजीच्या (Stunt) आधारानं व्हिडीओज तयार केले जातात. या व्हिडीओजना पुष्कळ लाईक्स आणि व्ह्यूज येताना दिसतात. परंतु असे जीवघेणे व्हिडीओज सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहेत. त्यातच असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे या व्हिडीओमध्ये चक्क एक इसम हा मेट्रोचा दरवाजा तोडून प्लॅटफॉर्मवर उडी मारतो. सध्या या व्हिडीओनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. असा व्हिडीओ करणं मात्र महागात पडू शकतो. (a man opens door and jumps out of the metro railway station video goes viral)

मेट्रोच्या ठिकाणी आपल्याला कायमच सुरक्षा पाळण्याचा सल्ला दिला जातो. चढताना उतरताना आपल्याला कायमच काळजी घ्यावी लागते. परंतु असे अनेक लोकं आहेत जे आपली जास्त काळजी घेता येत नाही. अतरंगी स्टंटबाजी करण्याच्या नादात मात्र नको ते प्रकार करत सुटतात सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका इसमानं असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News) आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. 

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की यात एक इसम हा मेट्रोचा एटोमॅटिक (Automatic Door) उघड-बंद होणारा बंद दरवाजा उघडतो आणि त्यातून उडी मारतो. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की हा इसम मेट्रोमध्ये एकटाच आहे. तो जोरजोरात मेट्रो घट्ट दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो. त्यानंतर त्याच्या हातून दरवाजा उघडला जातो आणि लगेचच तो कसलाच विचार न करता सरळ बाहेर उडी मारतो आणि प्लॅटफॉर्मवर जोरात जोरात आपटतो. सरतेशेवटी तो उठत नाही यावरून त्याला जोरात लागल असण्याची शक्यता आहे. 

विज्ञानाच्या नियमानूसार, तुम्ही जर स्पीडच्या विरूद्ध दिशेने जाल तर तुम्हाला त्याचा जोरात फटका बसू शकतो. हा व्हिडीओ @HowThingsWork_ नावाच्या हँडलवरून शेअर केला गेला आहे.  हा व्हिडिओ आतापर्यंत 8.6 दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे असून 187.2 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ 19 हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केला आहे. या व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.  

हा व्हायरल व्हिडिओ आपल्याला पुन्हा एकदा चेतावनी देतो की मेट्रोमध्ये प्रवास करताना नियम तोडणे जीवघेणे ठरू शकते. म्हणूनच असे कधीही प्रयत्न करू नका.