'ओ मां... प्यारी मां...'! लहान भावासाठी बहिणीचा मोठा त्याग, वाचताच डोळे पाणावतील

Viral Video : हृदयविकारानं कुटुंब हिरावलं, लहान भावासाठी बहिणीचा मोठा त्याग; राखीपेक्षा ममतेच्या नात्याला प्राधान्य. पाहा नात्यात आलेल्या वादळांना ती नेमकी कशी सामोरी गेली, पाहाच... 

सायली पाटील | Updated: Jun 23, 2023, 03:43 PM IST
'ओ मां... प्यारी मां...'! लहान भावासाठी बहिणीचा मोठा त्याग, वाचताच डोळे पाणावतील  title=
a lady decides to be unmarried to raise his younger brother watch video

Viral Video : जगणं स्वस्त झालंय असं म्हणण्यापेक्षा हल्ली आयुष्याची काहीच शाश्वती राहिलेली नाही हेच अनेकजण म्हणताना दिसतात. मुळात आजुबाजूला घडणाऱ्या घडामोडी आणि त्याचा आपल्यावर होणारा परिणाम पाहता हे म्हणणं पटतंही. कारण, या क्षणभंगुर आयुष्यामध्ये पावलोपावली इतकं सारं घडतं की काही समजण्याच्या आतच हातची वेळ निघून गेलेली असते. आपल्याकडे विचार करण्याचा वेळही नसतो आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा आपण बरेच पुढे आलेलो असतो. आयुष्याबद्दल इतकं गहन बोलण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ. 
 
एक गोष्ट एका कुटुंबाची, बहिणीच्या ममतेची... 

सोशल मीडियावर वारंवार पाहिला जाणारा हा व्हिडीओ नकळत तुम्हालाही तुमच्या कुटुंबाचं महत्त्वं पटवून देईल. ही गोष्ट आहे ज्योती मेहता नावाच्या तरुणीची. तिची कहाणी ऐकताना, तिचा निर्णय ऐकताना तिला शाबासकी द्यावी की या त्यागाला सलाम करावा हेच कळत नाही. तिची कहाणी जगासमोर आणलीये officialpeopleofindia नं

आयुष्याची वादळवाट...

ज्योतीच्या आयुष्यात वादळंच जास्त आली. 2007 मध्ये तिच्या भावाचा कार्डिअॅक अरेस्टनं मृत्यू झाला. तेव्हा तो अवघ्या 20 वर्षांचा होता. त्याच्या निधनानंतर तिची आई कोलमडली. अखेर त्यांना (IVF) आयव्हीएफच्या मदतीनं गर्भधारणेचा प्रयत्न केला. दोन अपयशी प्रयत्नांनंतर वयाच्या 46व्या वर्षी ज्योतीच्या आईनं एका मुलाला जन्म दिला. 

लहान भावाच्या जन्मामुळं ज्योतीच्या कुटुंबात आनंदच परतला होता. गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या होत्या पण नियतीला मात्र हेसुद्धा मान्य नव्हतं. 2012 या वर्षात ज्योतीच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. इथं मात्र ज्योतीचं बालपण हरवू लागलं. तिच्या खांद्यांवर कुटुंबाची जबबादारी आली. परिस्थिती, प्रसंग कठीण होता पण त्यातही ज्योती, तिची आणि आणि भावानं आनंद शोधण्यास सुरुवात केली. 

हेसुद्धा वाचा : White House मध्ये मोदींच्या डिनर टेबलवर चक्क Pate Wine! एका बॉटलची किंमत...

ज्योती आणि तिच्या कुटुंबाला आनंदाची चाहूल लागत नाही  तोच तिच्या आईनं 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळं अखेरचा श्वास घेतला. आता या कुटुंबात फक्त ज्योती आणि तिचा 13 वर्षांचा धाकटा भाऊच उरले. तब्बल 19 वर्षांनी लहान असणाऱ्या या भावासाठी ज्योती त्याच्या बहिणीपेक्षा त्याची आई झाली. आज 32 व्या वर्षीसुद्धा ज्योतीनं अविवाहित राहण्याचाच निर्णय घेतला आहे. भावाच्या संगोपनासाठी, त्याच्या भवितव्यासाठी ज्योतीनं केलेला हा त्याग शब्दांत मांडणंही अशक्य. तिची ही कहाणी आणि जीवनाचा संघर्ष पाहून अनेकांचेच डोळे पाणावत आहेत.