DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8 व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट !

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा कण्याची शक्यता आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या किमान पगारातही मोठी वाढ होऊ शकते.

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 14, 2023, 04:52 PM IST
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8 व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट ! title=

DA Hike News in Marathi : केंद्र सरकारने निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे संकेत मिळत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या तोंड्यावर केंद्र सरकार मोठी घोषणा करु शकते. तसे संकेत मिळत आहेत.  तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करत असेल, तर ही बातमी महत्त्वाची आहे. केंद्र सरकार 7 व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांसाठी कोणताही आयोग स्थापन करणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र आता केंद्र सरकारच्या मूड बदल्याचे संकेत मिळत आहेत. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर कर्माचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ करण्याची शक्यता आहे. आमची सहयोगी वेबसाइट 'झी बिझनेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देण्याचा विचार करत आहे.

किमान पगारात मोठी वाढ ?

7 व्या वेतन आयोगानंतर आता 8 व्या वेतन आयोगाची चर्चा सुरg झाली आहे. एवढेच नाही तर 8 व्या वेतन आयोगाची फाईलही तयार झाल्याचा दावा करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने 'झी बिझनेस'ने  दिली आहे. सरकार पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या किमान पगारातही मोठी वाढ होऊ शकते.

2024 मध्ये लोकसभा निवडणुका 

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेच्या आधारे आठवा वेतन आयोग येणार नाही, अशी अपेक्षा होती. पण, आता 7 व्या वेतन आयोगानंतर (7th pay Commission ) पुढील वेतन आयोग आणण्याची तयारी सुरु आहे. या सर्व प्रकाराबाबत शासनाकडून कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. खरे तर 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीचे वर्ष असल्याने कर्मचार्‍यांची कोणतीही नाराजी सरकार ओढवून घेणार नाही. त्यामुळे नव्या वेतन आयोगाबाबत संकेत मिळत आहेत.

मोदी सरकारकडून पुढील वेतन आयोगाची घोषणा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी केली जाऊ शकते. नव्या वेतन आयोगात काय होणार आणि काय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांवर असेल. त्यांच्या देखरेखीखालीच समिती स्थापन केली जाईल. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ मिळणार आहे. फिटमेंट फॅक्टरच्या बाबतीतही काही बदल होऊ शकतात. दरम्यान, सरकार 10 वर्षांतून एकदा वेतन आयोग स्थापन करते.