7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ होण्याचा मार्ग मोकळा

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकाने मोठी बातमी दिली आहे. पुढील वर्षीच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

Updated: Sep 2, 2022, 08:30 AM IST
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ होण्याचा मार्ग मोकळा title=

नवी दिल्ली : 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकाने मोठी बातमी दिली आहे. पुढील वर्षीच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी हाती आली आहे. जुलै महिन्याची AICPI निर्देशांकाची आकडेवारी कामगार मंत्रालयाने जाहीर केली आहे. 

जूनच्या तुलनेत त्यात 0.7 अंकांची वाढ झाली आहे. जूनमध्ये हा आकडा 129.2 होता, जो जुलैमध्ये वाढून 129.9 झाला आहे. या वाढीमुळे पुढील वर्षी जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
जुलै ते डिसेंबर या कालावधीतील AICPI निर्देशांकाच्या डेटाच्या आधारे 28 सप्टेंबर रोजी ही घोषणा केली जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षी जानेवारीमध्ये महागाई भत्ता वाढेल. जानेवारी ते जून या कालावधीतील आकडेवारीच्या आधारे जुलै महिन्यातील महागाई भत्त्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. जुलैचा महागाई भत्ता सरकार तिसऱ्या नवरात्रीला म्हणजेच 28 सप्टेंबरला जाहीर करेल, असा दावा सूत्रांनी केला आहे. यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.

 7व्या वेतन आयोगाच्या आधारे ( 7th Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये वाढवला जातो . त्याचा आधार सहा महिन्यांचा AICPI निर्देशांक आहे. यावेळी जुलैमध्ये महागाई भत्ता वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या थकबाकीसह सप्टेंबर महिन्याचा पगार मिळणार आहे.

DA किती वाढणार

यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. यानंतर ते 34 वरुन थेट 38 टक्क्यांपर्यंत वाढेल. सध्या सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. डीए 38 टक्के असल्याने पगारात चांगली वाढ होईल.

कामगार मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी 

केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता AICPI निर्देशांकाच्या आधारे अंदाजित केला जातो. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) ची आकडेवारी कामगार मंत्रालयाने जाहीर केली आहे. हा निर्देशांक 88 केंद्रांसाठी आणि संपूर्ण देशासाठी तयार करण्यात आला आहे. AICPI प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी रिलीज होतो.