'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत...' या करारावर आरोपीची कोर्टातून सुटका, काय आहे नेमकं प्रकरण?

Husband and Wife : बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीला कोर्टाने एका कराराच्या आधारावर सुटका केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

नेहा चौधरी | Updated: May 8, 2024, 04:00 PM IST
'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत...' या करारावर आरोपीची कोर्टातून सुटका, काय आहे नेमकं प्रकरण? title=
7 days with wife and 7 days with girlfriend acquittal of the accused from the court what is the case

Husband and Wife : कोर्टातील एक आश्चर्यचकित करणार प्रकरण समोर आलंय. न्यायालयात गुन्हेगारी जगतापासून कौटुंबिक अनेक प्रकारच्या घटनांवर कोर्टाला निर्णय द्यावा लागतो. चित्रपटच्या कथेलाही लाजवेल अशा घटना अनेक वेळा समोर येत असतात. असंच एक प्रकरण कोर्टासमोर आलं आणि या प्रकरणातील बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीची सुटका झाली. एका कराराच्या आधारावर या व्यक्तीवरील बलात्काराचा आरोप रद्द होऊन कोर्टाने त्याची सुटका केलीय. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊयात. (7 days with wife and 7 days with girlfriend acquittal of the accused from the court what is the case)

काय आहे नेमकं प्रकरण?

इंदूरमधील 3 वर्ष जुन्या प्रकरणावर कोर्टात सुनावणी झाली. याप्रकरणात आरोपीची दोषमुक्तता झाली आणि त्याची सुटका झाली. झालं असं की, प्रेयसीने प्रियकरावर बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली होती. हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यावर एका करार सादर करण्यात आला ज्यामुळे त्या आरोपीची निर्दोष मुक्तता झाली.

हे प्रकरण 27 जुलै 2021 मधील असून यात एका तरुणीने आपल्या प्रियकराविरोधात भंवरकुआं पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार नोंदवली. तसंच पोलिसांना तिने सांगितलं की, तिचा जबरदस्ती गर्भपात करण्यात आला. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल केली आणि आरोपीला अटक केली. जेव्हा हे प्रकरण कोर्टात गेले तेव्हा कोर्टात एक करार सादर करण्यात आला. 

कोर्टात असं समोर आलं की, पीडित तरुणी आरोपी तरुणाला तब्बल 2 वर्षांपासून ओळखते. हा तरुण पूर्वीपासून विवाहित होता. तरीदेखील ती तरुणी त्याच्यासोबत प्रेम प्रकरणात होती. ते दोघे लिव्ह इन रिलेनशशिपमध्ये राहत होते, असं तरुणीने कोर्टात मान्य केलं. शिवाय गर्भपातानंतरही तरुणी तरुणासोबत राहत होती. याचा अर्थ त्या दोघांमध्ये सहमतीने लैगिक संबंध प्रस्तापित झाले हे समोर आलं. त्यामुळे त्या तरुणावर जबरदस्ती गर्भपात आणि बलात्काराचा आरोप सिद्ध होत नाही, असं कोर्टाने सांगितलं.  

कोर्टात सादर करण्यात आलेल्या करारात असं होती की, तो व्यक्ती पत्नीसोबत सात दिवस राहील आणि आपल्या प्रेयसीसोबत सात दिवस राहणार आहे. हा करार मान्य करत कोर्टाने त्या व्यक्तीची सुटका केली.