5G: खराब नेटवर्कमुळे कंटाळला आहात? फोनमधील ही सेटींग बदलून घ्या आनंद

5g Network Speed: अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये 5जी नेटवर्कचा स्पीड कसा वाढवायचा? याबद्दल जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Updated: Mar 30, 2024, 01:11 PM IST
5G: खराब नेटवर्कमुळे कंटाळला आहात? फोनमधील ही सेटींग बदलून घ्या आनंद title=
5g network

5g Network Speed:आजकाल सर्वांच्याच हातात मोबाईल फोन आले आहेत. अशावेळी चांगले नेटवर्क मिळणे महत्वाचे ठरते. नेटवर्क नसणे, स्लो असणे अशा समस्यांना अनेकजण सामोरे जात असतात. मोबाईल गेम्स, व्हिडीओच्या वाढत्या स्पर्धेत लोकांना आता फोरजी कमी पडू लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता देशामध्ये 5जी लॉन्चिग झाले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हायस्पीड 5जी इंटरनेट पोहोचलंय, असा दावा टेलिकॉम कंपन्या करतायत. असं असताना शहरातील लोकं कॉल ड्रॉपच्या समस्येने त्रस्त आहेत. तर गावाकडील मंडळी कॉल आणि इंटरनेट दोन्ही समस्यांचा सामना करतायत. तुम्हीदेखील खराब इंटरनेटने त्रस्त झाला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये 5जी नेटवर्कचा स्पीड कसा वाढवायचा? याबद्दल जाणून घेऊया. 

नेटवर्क सेटींग्जमध्ये बदल

जर तुमचे इंटरनेट स्लो चालत असेल तर तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. केवळ तुमच्या मोबाईलची सेटिंग्ज तपासावी आणि आवश्यक असल्यास बदलावी लागणार आहे. सर्वप्रथम फोनच्या सेटिंग्जमध्ये जा आणि प्रिफर्ड टाइप ऑफ नेटवर्कला 5जी किंवा ऑटो पर्याय निवडा. 

APN योग्य असणं आहे गरजेचं 

याव्यतिरिक्त सेटिंग्ज एक्सेस पॉईंट नेटवर्क (एपीएन) ची सेटिंग्जदेखील तपासत राहा. कारण चांगल्या स्पीडसाठी योग्य एपीएन असणं आवश्यक असतं. यासाठी एपीएन सेटिंग्जच्या मेन्यूमध्ये जा. सेटिंग्जला डिफॉल्ट म्हणून सेट करा. 

दिवसभर मोबाईलमध्ये असता? भंगेल बाप बनायचे स्वप्न!

सोशल मीडिया अ‍ॅप्सवर नजर 

याशिवाय तुम्ही वापरत असलेल्या सोशल मीडिया अ‍ॅपवर नजर टाता. फेसबुक, एक्स आणि इन्स्टाग्राम अॅपमुळे मोबाईलचा स्पीड कमी होतो. यामुळे जास्त डेटा खर्च होतो.

यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन ऑटो प्ले व्हिडीओ बंद करा. तसेच फोनच्या ब्राऊजरचा डेटा सेव्ह मोडमध्ये सेट करा. 

युट्यूब शॉर्ट्समधून पैसे कमावणं खूपचं सोपं! 'हा' क्रायटेरिया पूर्ण करुन व्हा श्रीमंत

रिसेटचा शेवटचा पर्याय 

सर्व पर्याय आजमावून झाले आणि तरीदेखील मोबाईल नेटवर्कला स्पीड मिळत नसले तर एक शेवटचा पर्याय करा. आपल्या फोनमधील नेटवर्क सेटिंग रिसेट करा.  डिफॉल्ट नेटवर्क सेटिंगवर चांगला स्पीड मिळण्याची शक्यता जास्त असते.

शेतात लावली 13000 सागवानाची झाडे; 20 वर्षात शेतकरी बनला 100 कोटींचा मालक