नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी 5 अतिरेक्यांना अटक केली आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर रविवारी रात्री पूर्व दिल्लीतील शकरपूर भागात या अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रविवारी रात्री या पाच दहशतवाद्यांना पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि इतर स्फोटक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलीस या पाच दहशतवाद्यांची कसून चौकशी करत आहेत.
पाकिस्तान कनेक्शन
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान या पाच दहशतवाद्यांचे संबंध पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आयएसआय सोबत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयच्या सांगण्यावरून ते दहशतवादी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करीत होते. शेतकरी आंदोलनाच्या वेळी त्यांची उपस्थिती देखील अनेक प्रश्न उपस्थित करीत आहे?
Delhi: Visuals from Shakarpur where five persons have been arrested following an encounter. According to Delhi Police, the group was backed by ISI for narcoterrorism. pic.twitter.com/X4dc4Q0xfT
— ANI (@ANI) December 7, 2020
असे म्हटले जात आहे की, हे पाच दहशतवादी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात होते. चौकशी दरम्यान असे निष्पन्न झाले आहे की, या पाच पैकी जण ३ काश्मीर आणि २ जण पंजाबशी संबंधित आहेत.
पूर्व दिल्लीतील शकरपूर भागात चकमकीनंतर पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या पाच दहशतवाद्यांचा वापर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसकडून केला जात असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. हे दहशतवादी दिल्लीत कोणता कट रचत होते याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.