80 वर्षीय देवदासने केलं 76 वर्षीय मगुद बाईशी लग्न

मंगळवारी मादडी येथे एका 80 वर्षीय वृध्द व्यक्तीन लीव इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या 76 वर्षी वृद्ध महिलेशी लग्न केलं आहे. 46 वर्षापासून हे दोघेजण लीव इन रिलेशनमध्ये राहत होते. त्यांनी 27 मार्च रोजी अगदी विधीवत लग्न केलं आहे. यावेळी आश्चर्याची बाब म्हणजे त्यांची मुलं - मुलीदेखील तेथे उपस्थित होते.

Dakshata Thasale Updated: Mar 28, 2018, 09:29 AM IST
80 वर्षीय देवदासने केलं 76 वर्षीय मगुद बाईशी लग्न  title=

उदयपुर : मंगळवारी मादडी येथे एका 80 वर्षीय वृध्द व्यक्तीन लीव इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या 76 वर्षी वृद्ध महिलेशी लग्न केलं आहे. 46 वर्षापासून हे दोघेजण लीव इन रिलेशनमध्ये राहत होते. त्यांनी 27 मार्च रोजी अगदी विधीवत लग्न केलं आहे. यावेळी आश्चर्याची बाब म्हणजे त्यांची मुलं - मुलीदेखील तेथे उपस्थित होते.

कुटुंबियांच्या उपस्थितीत झालेल्या या लग्नाची पंचक्रोशित चर्चा होती. धक्कादायक बाब म्हणजे या 80 वर्षाच्या देवदास या ज्येष्ठ व्यक्तीची पहिली पत्नी असून ती आजारपणामुळे या लग्नात सहभागी होऊ शकली नाही. देवदास यांची पहिली पत्नी चम्पाबाई यांच्यासोबत संसार सुरू असताना मगदुबाई यांना पळवून आणलं. यांच्याशी लग्न केलं नाही पण प्रियसी म्हणून देवदास यांनी या दोन्ही महिलांशी संसार केला. गेली 48 वर्षे दोघांशी सुखाने संसार करत आहेत. 

लीव इन ही गोष्ट आता लोकांना माहित आहे. अजूनही आपल्या समाजात परवानगी नाही मात्र तरीही ही गोष्ट समाजाला माहित आहे. मात्र, 48 वर्षापूर्वी लिव इन ही बाब खूप धक्कादायक होती. त्यामुळे या गोष्टीची चर्चा अधिक स्वरूपात होत आहे.