पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले...

पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्याचे चित्र दिसत आहे.

Updated: Mar 28, 2018, 09:19 AM IST
पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले... title=

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या एका आठवड्यात पेट्रोलची किंमत ७० पैशांनी वाढली आहे. डिझेल देखील एक रुपयाने महाग झाले आहे. जानेवारीनंतर मार्चच्या शेवटापर्यंत पुन्हा एकदा देशाची राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत ८० रुपये लीटर झाली आहे. तर डिझेलची किंमत सुमारे ६८ रुपये लीटर झाली आहे. सिनियर एनालिस्ट अरुण केजरीवाल यांच्या नुसार, पेट्रोलचे भाव तेजीने वाढतील. 

इतकी झाली वाढ

गेल्या आठवड्यात पेट्रोल ७० पैशांनी महागले होते. २१ मार्चला मुंबईत पेट्रोलची किंमत ८०.०७ रुपये लीटर होती. तर २८ मार्चपर्यंत ती ८०.७७ इतकी झाली. याचा अर्थ एक आठवड्यात पेट्रोलची किंमत ७० पैशांनी वाढवण्यात आली. तर  २१ मार्चला डिझेलची किंमत ६६.८८ रुपये लीटर होती. २८ मार्चपर्यंत ही किंमत ६७.९१ इतकी झाली. याचा अर्थ या आठवड्यात डिझेलची किंमत १ रुपये ३ पैशांनी वाढली.

चार शहरांमधील पेट्रोलचे भाव

  • दिल्ली- ७२.९०/लीटर
  • मुंबई- ८०.७७/लीटर
  • कोलकता- ७५.६३/लीटर
  • चेन्नई- ७५.६१/लीटर

चार शहारांमधील डिझेलचे भाव

  • दिल्ली- ६३.७७/लीटर
  • मुंबई- ६७.९१/लीटर
  • कोलकता- ६६.४६/लीटर
  • चेन्नई- ६७.२५/लीटर

सुप्रीम कोर्टाने दिला होता खास सल्ला

देशात प्रदूषणाचे वाढते प्रमाण पाहता ते नियंत्रित करणे गरजेचे आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने डिझेलचे भाव वाढवले आहेत. दिल्ली-एनसीआरच्या शिवाय देशातील अनेक शहारांमध्ये हवेचा स्तर खराब होत आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रित ठेवण्याचा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे. १३ मेट्रो सिटीमध्ये एप्रिल २०१९ पर्यंत BS-VI इंधनाचे रोल आऊट करण्याचा प्रस्ताव देखील देण्यात आला आहे.
यासाठी केंद्र सरकार आणि ऑईल मार्केटिंग कंपन्यांशी चर्चा करणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.