अरे देवा.... देशात कोरोना प्रादुर्भाव वाढला; रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४,९०,४०१ इतका झाला आहे. 

Updated: Jun 26, 2020, 10:04 AM IST
अरे देवा.... देशात कोरोना प्रादुर्भाव वाढला; रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ title=

नवी दिल्ली: गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे १७,२९६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचार सुरु असलेल्या ४०७ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या संख्येत ही आतापर्यंत झालेली सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४,९०,४०१ इतका झाला आहे. यापैकी १,८९,४६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशभरात २,८५, ६३७ लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. याशिवाय, देशभरात आतापर्यंत ७७, ७६,२२८ लोकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

धारावी नाही, तर मुंबईचा हा भाग ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्र कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या बाबतीत नवनवे उच्चांक गाठत आहे. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या ४,८४१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १९२ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील सध्याचा मृत्यूदर ४.६९ टक्के एवढा आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १,४७,७४१ एवढी झाली आहे. यातले ६३,३४२ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत. 

मुंबईला मागे टाकत 'या' शहरात रुग्णसंख्येत गाठला उच्चांक

मुंबईत गुरुवारी १,३५० रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ७०,८७८ एवढी झाली. मुंबईमध्ये काल दिवसभरात ५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतल्या एकूण मृत्यूंची संख्या ४,०६२ वर पोहोचली आहे.