'मम्मी-पप्पा आता स्ट्रेस सहन होत नाही...' चिठ्ठी लिहित ज्युनिअर डॉक्टरने संपवलं जीवन

पालकांनो ही बातमी वाचा, स्ट्रेस सहन न झाल्याने चार इंजेक्शन टोचून घेत महिला ज्युनिअर डॉक्टरने घेत उचललं टोकाचं पाऊल... घटनेने खळबळ

Updated: Jan 9, 2023, 02:13 PM IST
'मम्मी-पप्पा आता स्ट्रेस सहन होत नाही...' चिठ्ठी लिहित ज्युनिअर डॉक्टरने संपवलं जीवन title=

Crime News : आपल्या मुलीने मोठं डॉक्टर (Docter) व्हावं म्हणून तिच्या आई-वडिलांना तीला मेडिकल सायन्सला (Medical Science) प्रवेश घेऊन दिला. मुलगीही हुशार होती. केवळ आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करत होती. पण अभ्यासाचा ताण ती सहन करु शकली नाही आणि अखेर तीने टोकाचा निर्णय घेतला. गांधी मेडिकल कॉलेजमध्ये (Gandhi Medical College) पीडियाट्रिक विभागात (Pediatric Department) ज्युनिअर डॉक्टर (Junior Doctor) म्हणून काम करणाऱ्या अवघ्या 24 वर्षांच्या आकांक्षा माहेश्वरीच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. (Dr. Akanksha Maheshwari Suicide Case)

आकांक्षाने केली आत्महत्या
मध्य प्रदेशमधल्या (Madya Pradesh) भोपाळ (Bhopal) इथल्या गांधी मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आकांशाने आपल्या हॉस्टेलच्या रुममध्ये बेशुद्धीची चार इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी एक सुसायड नोट मिळाली आहे. यात तीने लिहिलंय, मी इतकी सहनशील नाही, ताण झेलू शकत नाही.

आत्महत्येच्या दिवशी घेतली होती सुट्टी
आत्महत्येच्या दिवशी आकांक्षाने आपल्या विभागात फोन करुन तब्येत ठिक नसल्याने ड्युटीवर येऊ शकत नसल्याचं सांगितलं होतं. आकांक्षा ही मुळची ग्वालिअरमधली (Gwalior) राहणारी आहे. जीएमसीमध्ये (GMC) ती पीडियाट्रिक विभागात पहिल्या वर्षाला होती. सकाळी तीने तब्येतीचं कारण सांगत सुट्टी घेतली. सकाळपासून तिच्या रुमचा दरवाची बंद होता. संध्याकाळी सात-साडेसात वाजेपर्यंतही दरवाजा न उघडल्याने सुरक्षा रक्षकाला संशय आला.

आकांक्षाच्या रुममध्ये सापडली चिठ्ठी
सुरक्षा रक्षकाने याची माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठांनी तात्काळ आकांक्षाच्या रुमजवळ धाव घेत त्यांच्याजवळ असलेल्या चावीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच समोर बेडवर आकांशा निपचीत पडलेली दिसली. डॉक्टरांनी तिला तपासलं पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला, यावेळी त्यांना रुमध्ये एक चिठ्ठी सापडली. याशिवाय चार इंजेक्शन आणि बेशुद्धीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या चार रिकाम्या बाटल्या आढळल्या.

आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
या घटनेची माहिती आकांक्षाच्या आई-वडिलांना देण्यात आली. अवघ्या 24 वर्षांच्या आकांक्षाच्या जाण्याने तिच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आकांक्षाच्या इतर मैत्रिणींकडून अगदी माहिती पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकांक्षाच्या रुममध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. यात तीने आई-वडिलांची माफी मागितली आहे. तसंच मी इतकी सहनशील नाहीए, मला स्ट्रेस सहन होत नाही असंही या चिठ्ठीत तीने लिहिलंय. वैयक्तिक कारणाने आत्महत्या करत असून यात कोणीही दोषी नसल्याचंही आकांक्षाने चिठ्ठित लिहिलंय.