Tirupati News : तिरुपती मंदिरात दर्शनासाठी जाण्याआधी 'ही' बातमी वाचा

Tirupati Tirumala : जर तुम्ही तिरुपती मंदिरात दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.  विदर्भ आणि मराठवाड्यात तिरुपतीला दर्शनासाठी जाणारे मोठ्या संख्येने भक्त आहेत.  दरवर्षी मोठ्या संख्येने भक्त तिरुपतीला जातात.

Updated: Jan 9, 2023, 12:27 PM IST
Tirupati News : तिरुपती मंदिरात दर्शनासाठी जाण्याआधी 'ही' बातमी वाचा title=
trending news tirumala online booking and tirumala tirupathi devasthanams guest house rent hike marathi news

Tirupati Online Ticket Booking : नवीन वर्षात मोठ्या संख्येने लोक हे तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जातात. जर तुम्ही पण तिरुमलाला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भक्त हे तिरुपतीला दर्शनासाठी जातात. त्यामुळे आता त्यांचा खिशाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण तिरुमला तिरुपती देवस्थानम ने तिरुमला इथल्या आधुनिक अतिथीगृह आणि कॉटेजची भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ थोडीथोडकी नाही तर तब्बल 10 पटीने केली आहे. त्यामुळे भक्तांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. 

आता द्यावे लागणार इतके पैसे

तिरुमला तिरुपती देवस्थानम हे कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चे असतं. काही महिन्यांपूर्वी प्रसादाच्या लाडूच्या वजनावरुन वाद झाला होता. आता अतिथीगृह आणि कॉटेजची भाडेवाढ केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पूर्वी या नारायणगिरी अतिथीगृहासाठी भक्तांना 750 रुपये द्यावे लागायचे. मात्र आता त्यांना 1700 रुपये द्यावे लागणार आहेत.  तर कॉटेजसाठी 2200 द्यावे लागणार आहेत. तिरुमला इथे बालाजी मंदिरात जे भाविक जाऊन आले आहेत. त्यांनी कायम हा आरोप केला आहे की, गेल्या काही वर्षांपासून तिरुपती मंदिरात व्यावसायिक होतं चालं आहे. या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होणार असून शिवाय अनेक भाविक दर्शनासाठी वंचित राहण्याची शक्यता आहे. (trending news tirumala online booking and tirumala tirupathi devasthanams guest house rent hike marathi news)

TTD कडून स्पष्टीकरण

जेव्हा अनेकांनी या भाडेवाढीला विरोध केला असल्या तरी काही लोकांनी यांचं समर्थन केलं आहे. तर TTD ने भाडेवाढीसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्यानुसार SV विश्रामगृह आणि नारायणगिरी विश्रामगृह हे अत्याधुनिक सेवासुविधांनी परिपूर्ण असून त्यांचं आता नुतनीकरण करण्यात आला आहे. 

आजपासून ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू

तिरुपतीला दर्शनासाठी जाणार असाल लगेचच बुकिंग करा. कारण आजपासून अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंगला सुरुवात झाली आहे. भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या भक्तांसाठी 300 रुपये किंमतीचे ऑनलाइन कोटा विशेष प्रवेश दर्शन (SED) तिकिटे जारी करेल. हे तिकीट 12 जानेवारी ते 31 जानेवारी आणि फेब्रुवारीसाठी असेल. तर 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत बालयममुळे दर्शनाला परवानगी दिली जाणार नसल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे. 

असं करा ऑनलाइन बुकिंग 

तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराची अधिकृत वेबसाइटवर जा
आता यात मोबाईल नंबर, कॅप्चा कोड भरा. 
त्यानंतर आता जनरेट ओटीपी हा ऑप्शन सिलेक्ट करा. 
तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर सहा अंकी ओटीपी येईल.
आता तो नंबर भरा. 
त्यानंतर लॉगिनवर क्लिक करा. 
आता तुम्हाला कॅलेंडर दिसेल. 
त्यामध्ये तुम्हाला ज्या तारखेचं बुकिंग करायचं आहे ती डेट सिलेक्ट करा. 
आता तुम्हाला एक अर्ज दिसेल तो अर्ज काळजीपूर्व भरा.