नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याच्या गोशाळेतच तब्बल २०० गायींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
दुर्ग जिल्ह्यातील राजपूर गावात ही गोशाळा आहे. गावाचे सरपंच सेवाराम साहू यांनी सांगितलं की, उपासमार आणि योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गोशाळेतील २०० गायींचा मृत्यू झाला आहे.
राजपूर गावात असलेल्या गावात स्थानिक भाजप नेता आणि नगरपालिका उपाध्यक्ष हरिश वर्मा यांच्या मालकीची गोशाळा आहे. या गोशाळेत उपासमार आणि पाण्याच्या कमतरतेमुळे आठवड्याभरात दोनशे गायींचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Over 200 cows dead in 2 days due to starvation in a Gaushala in Chattisgarh's Durg says Rajpur village Sarpanch Pati Sevaram Sahu pic.twitter.com/AK6560q4Ur
— ANI (@ANI) August 18, 2017
या घटनेची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर मृत गायींचे दफन गोशाळेजवळच करण्यात आले आहे. उपासमार आणि औषधांच्या अपु-या पुरवठ्यामुळे गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.