तामिळनाडूत बस - ट्रक भीषण अपघातात १९ जण जागीच ठार

तामिळनाडूत कोईंबतूरमध्ये झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात १९ जण ठार झालेत.  

Updated: Feb 20, 2020, 08:55 PM IST
तामिळनाडूत बस - ट्रक भीषण अपघातात १९ जण जागीच ठार title=
Pic Courtesy: ANI

कोईंबतूर : तामिळनाडूत कोईंबतूरमध्ये झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात १९ जण ठार झालेत. कोईंबतूर जिल्ह्यात अवनशी गावात हा अपघात झाला. केरळातल्या तिरूअनंतपुरम इथून बंगळुरूकडे ही बस चालली होती. कोईंबतूरपासून ४० किमी अंतरावर हा अपघात झाला. कोईंबतूर सालेम हायवेवर पहाटे हा अपघात झाला. बसमध्ये ४८ प्रवासी होते, त्यातले १९ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. 

तामि‍ळनाडूच्या तिरुपूर जिह्यात केरळ राज्य परिवहनची बस आणि ट्रकच्या यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी अविनाशी कस्बा येथे घडली. बस बंगळूर ते तिरुवनंतपूरमकडे जात होती. मृत्यू झालेल्यांमध्ये १४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. ट्रक कोईमतूर-सेलम राजमार्गावर विरूध्द दिशेने येत होता, त्यावेळी दोन्ही गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. ही दुर्घटना पहाटे साडे चार वाजता झाली, अशी माहिती अविनाशीचे नायब तहसीलदार यांनी दिली.  

दरम्यान, केरळ राज्याचे रस्ते परिवहन निगम (केएसआरटीसी) चे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. केएसआरटीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर चौकशी करतील आणि अहवाल सादर करतील, अशी माहिती केरळचे परिवहन मंत्री एके ससींद्रन यांनी दिली.