घरोघरी चॉकलेट विकणाऱ्याच्या बॅंक खात्यात १८ कोटी, इन्कम टॅक्स विभागाची नोटीस

नोटबंदीनंतर काहींच्या खात्यात अचानक पैसे जमा झालेत. मात्र, हे पैसे कोणाचे याची माहिती उपलब्ध झालेली नाही. आता तसाच एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय. घरोघरी जाऊन चॉकलेट विकणाऱ्याच्या बॅंक खात्यात चक्क १८ कोटी रुपये जमा झाल्याचे पुढे आलेय. ही रक्कम मुंबईतून भरली गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी पैशाबाबत तपशील मागितलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 4, 2017, 08:35 PM IST
घरोघरी चॉकलेट विकणाऱ्याच्या बॅंक खात्यात १८ कोटी, इन्कम टॅक्स विभागाची नोटीस title=

हैदराबाद : नोटबंदीनंतर काहींच्या खात्यात अचानक पैसे जमा झालेत. मात्र, हे पैसे कोणाचे याची माहिती उपलब्ध झालेली नाही. आता तसाच एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय. घरोघरी जाऊन चॉकलेट विकणाऱ्याच्या बॅंक खात्यात चक्क १८ कोटी रुपये जमा झाल्याचे पुढे आलेय. ही रक्कम मुंबईतून भरली गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी पैशाबाबत तपशील मागितलाय.

आयकर विभागानेही या व्यवहाराची दखल घेत चॉकलेट विक्रेत्याला नोटीस पाठवली आहे. या व्यवहारांशी माझा काहीच संबंध नाही असे त्या चॉकलेट विक्रेत्याचे म्हणणे आहे. मात्र, बँक खात्यात तब्बल १८ कोटी जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे राहणारे सी किशोरलाल हे चॉकलेट विकण्याचे काम करतात. घरोघरी जाऊन ते चॉकलेट विकतात. अहमदाबादमधील एका अर्बन क्रेडिट सोसायटी या बँकेची एक शाखा नुकतीच विजयवाडा येथे सुरु झाली. या शाखेत किशोरलाल यांनीदेखील खाते उघडले. त्यांच्या खात्यात तब्बल१८ कोटी रुपये जमा झाल्याने किशोरलाल सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत.