आता या २ योजनांसाठी देखील आधार कार्ड अनिवार्य

आधार कार्ड आता हळूहळू सर्वच गोष्टींसाठी अनिवार्य होत चाललं आहे. विविध सरकारी सेवांसाठी आता आधार कार्ड आवश्यक झालं आहे. सरकारने आता रॉकेल खरेदीवर सबसिडीसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहेत. जे लोकं अटल पेंशन योजनेचा लाभ घेतात त्यांना आता आधार कार्डद्वारे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Updated: Jun 4, 2017, 05:54 PM IST
आता या २ योजनांसाठी देखील आधार कार्ड अनिवार्य title=

नवी दिल्ली : आधार कार्ड आता हळूहळू सर्वच गोष्टींसाठी अनिवार्य होत चाललं आहे. विविध सरकारी सेवांसाठी आता आधार कार्ड आवश्यक झालं आहे. सरकारने आता रॉकेल खरेदीवर सबसिडीसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहेत. जे लोकं अटल पेंशन योजनेचा लाभ घेतात त्यांना आता आधार कार्डद्वारे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

सबसिडीच्या लाभ घेण्यासाठी सरकारने ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. अटल पेंशन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर १५ जूनपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. आधार कार्ड सोबतच रेशन कार्ड, ड्राइविंग लायसेंस, मतदार ओळखपत्र, फोटो सोबतच शेतकरी पासबूक, मनरेगाच्या अंतर्गत मिळालेलं जॉब कार्ड ही कागदपत्र आवश्यक असणार आहेत. आधार कार्डला या योजनेमध्ये सबसिडी देतांना भ्रष्टाचाराला आळा घातला येणार आहे.