प्रियकराच्या मदतीने चुलतीने केला पुतणीवर बलात्कार

आरोपी चुलतीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पुतणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलीस दप्तरी नोंद झाला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 4, 2018, 11:27 AM IST
प्रियकराच्या मदतीने चुलतीने केला पुतणीवर बलात्कार title=

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील मुरेन जिल्ह्यातील सबलगढ पोलीस ठाणे परिसरात एक अल्पवयीन मुलगी आपल्या चुलतीच्याच अत्याचाराची बळी ठरली आहे. आरोपी चुलतीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पुतणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलीस दप्तरी नोंद झाला आहे.

पोलिसांत तक्रार दिल्यावर प्रकारणाला वाचा फुटली

घटना आहे सबलगड येथील संजय नगर हिरापूर गवातील. येथील एका अल्पवयीन मुलीवर चक्क तिच्या चुलतीनेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार पुढे आला आहे. आपल्या चुलतीच्याच ओळखीतली एका व्यक्तीच्या मदतीने पीडितेने पोलिसांत तक्रार दिल्यावर या खळबळजनक प्रकारणाला वाचा फुटली.

निमित्त शेतातून भाजी आणण्याचे...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी महिलेने (पीडितेची चुलती) पीडितेला भाजी आणण्याचे निमित्त काढून शेतात नेले. दरम्यान, आरोपी महिलेचा प्रियकर गब्बे मल्लाह शेतात आगोदरच उपस्थित होता. आरोपी, पीडिता आणि प्रियकर गब्बे यांची शेतात भेट झाली. त्यानंतर महिलेने पीडितेला प्रियकर गब्बे याच्यासोबत भाजी आणण्यासाठी शेतात पाठवले. पीडिता सोबत एकटीच पाहून गब्बेने तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे ही घटना १ फेब्रुवारीला घडली. पीडिता १५ वर्षे वयाची आहे.

प्रकरणाची वाच्यता टाळण्यासाठी पैशाचे आमिष

दरम्यान, घडल्या प्रकरणाची कोठेही वाच्यता होऊ नये यासाठी आरोपी गब्बे मल्लाह याने पीडितेला पैशाचे आमिष दाखवले. तरीही, पीडितेने आपल्या चुलतीजवळ घडल्या प्रकरणाची माहिती दिली. पण, चुलतीनेही प्रियकराचीच बाजू घेत त्याच्याकडून तुला पैसै मिळवून देते असे सांगत प्रकरणावर पांगरून टाकण्याच प्रयत्न केला. मात्र, पीडितेने हिंमत एटवटून अन्यायाचा विरोध करण्याचे ठरवले. तिने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर पीडितेने आपल्या नातेवाईकाच्या मदतीने पोलिसांत तक्रार दिली.

पास्को कायद्याखाली गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पास्को कायद्याखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तसेच, पीडितेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहेत. तर, आरोपी गब्बे मल्लाह अद्याप पसार आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.