मिनी बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्गावरच्या दरीत एक मिनी बस कोसळून भीषण अपघात घडलाय. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय... तर १९ हून अधिक जण जखमी आहेत. 

Updated: Oct 6, 2018, 05:03 PM IST
मिनी बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू  title=

बनिहाल, जम्मू - काश्मीर : जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्गावरच्या दरीत एक मिनी बस कोसळून भीषण अपघात घडलाय. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय... तर १९ हून अधिक जण जखमी आहेत. 

रामबनचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक अनिता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बस बनिहालहून रामबनला जात होती. बस मारुफच्या नजिक पोहचल्यानंतर वाहन चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि बस २०० फूट खोल दरीत कोसळली. 

या घटनेचं वृत्त समजताच मदतकार्य सुरू झालंय. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बचावकार्य सुरू आहे. १५ जणांचा मृत्यू झालाय त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.