Indian Citizenship : जयपूर येथे वास्तव्यास असलेले 14 विस्तापित पाकिस्तानी भारतीय बनले आहेत. जयपूरच्या (Rajasthan, jaipur) जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले. नागरिकत्व मिळाल्यावर या सर्वांनी वंदे भारतच्या घोषणा दिल्या. यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळाला. या हिंदू नागरिकांनी अत्याचारांना कंटाळून पाकिस्तान सोडला होता.
नागरिकत्व मिळालेल्यांमध्ये 2 मुलींसह 6 महिला, 2 मुलांसह एकूण 8 पुरुषांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी प्रकाश राजपुरोहित यांनी या 14 जणांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले. कमल कुमार (52) आणि त्यांची पत्नी सुनीता (49), नानक राम (82) आणि त्यांची पत्नी सतीबाई (71), मुलगा महेश (51), मीना (45) पत्नी संदेश कुमार, हेमलता शर्मा (45) ) आणि त्यांचे पत्नी चिदम कुमार, नख्ता राम (65) आणि त्यांची पत्नी सायबी देवी (63), पृथ्वीराज (41) मुलगा शोकर मल, मीरूराम यांचा मुलगा नरेश (16) आणि मुलगी रिम्शा (18), बलम राम यांची 14 वर्षांची मुलगी रवीना आणि एक मुलगी. 18 वर्षीय मुलगा रोवी कुमारला नागरिकत्व प्रमाणपत्र मिळाले आहे.
पाकिस्तानात खूप वाईट काळ पाहिला आहे. आम्हाला हिंदू हिंदू म्हणून त्रास दिला जायचा. आम्हाला व्यवसाय करु दिला जात नव्हता. आमचं जगणे मुश्किल झाले होते अत्याचारांना कंटाळून आम्ही पाकिस्तान सोडला आणि भारतात आलो. आमचे भाऊ बंद अजूनही पाकिस्तानात आहेत. त्यांना देखील भारताचे नागरिक होण्याची इच्छा असल्याचे या विस्थापितांनी भारताचे नागरिकत्व मिळाल्यावर सांगितले.
राजस्थान येथे राहत असलेले हे 14 पाक विस्थापित नागरीक मागील 13 वर्षापासून भारताचे नागरिकत्व मिळण्याची प्रतिक्षा करत होते. नागरिकत्वाच्या पुराव्याअभावी त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नव्हता. मात्र, आता नागरिकत्व मिळाल्याने या सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकत्वाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या सर्वांनी वंदे भारत आणि भारत माता की जय... अशा घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला.