तुमचे हात सांगतील तुमच्या आरोग्याची स्थिती; 'या' लक्षणांनी करू नका इग्नोर!

काही पद्धतीच्या मेडिकल कंडीशन्सचा प्रभाव आपल्या हातांवर पडतात. ज्यामध्ये आरोग्याच्या समस्यांचा समावेश आहे.

Updated: Nov 16, 2022, 04:50 PM IST
तुमचे हात सांगतील तुमच्या आरोग्याची स्थिती; 'या' लक्षणांनी करू नका इग्नोर! title=

मुंबई : दररोजच्या कोणत्याही कामासाठी आपल्याला आपल्या हातांची गरज असतेच. अशावेळी जेवण असो किंवा काहीतरी काहीतरी उचलणं तसंच लिहिणं असो. अशा परिस्थितीत तुम्हाला कधीही हाताची समस्या उद्भवली तर त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. ज्याप्रमाणे शरीराच्या आतील समस्येची (Health Problems) लक्षणं शरीराच्या इतर भागात दिसू लागतात, त्याचप्रमाणे काही गंभीर समस्यांची लक्षणं (symptoms) हातांच्या माध्यमातूनही तुम्हाला दिसू शकतात.

इंग्लंडमधील चेस्टर युनिवर्सिटीतील सीनियर लेक्चरर डॉ. गॅरेथ नी यांनी ब्रिटिश टॅब्लॉइड डेली स्टारला माहिती दिल्याप्रमाणे, बोटं लाल होणं आणि सूज येणं हे अनेक समस्यांचं लक्षण असू शकतं. वॉटर रिटेंशन समस्या ज्यामध्ये बोटांमधील पाण्याचं प्रमाण वाढतं. 65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. यामध्ये सांधेदुखी होऊन बोटं फुगीर होताता आणि तीव्र वेदना होतात.

काही पद्धतीच्या मेडिकल कंडीशन्सचा प्रभाव आपल्या हातांवर पडतात. ज्यामध्ये खाली दिलेल्या समस्यांचा समावेश आहे.

आर्थरायटीस (arthritis)

सांध्याची हाडं कमकुवत होणं. यावेळी वेदना आणि सूज येणं

कार्पल टनल सिंड्रोम (Carpal tunnel syndrome)

Carpal tunnel syndrome मध्ये तुमच्या मनगटाच्या 2 नसा दाबल्या जातात. ज्यामुळे संपूर्ण हाताला वेदना जाणवतात. 

ट्रिगर फिंगर्स

ट्रिगर फिंगर्स एक अशी स्थितीत आहे, ज्यामध्ये बोटांच्या टेन्डन्समध्ये काही कारणाने सूज येते. या परिणाम तुमच्या मसल्सवरही होतो. परिणामी बोटांना सूज येऊन प्रचंड वेदना होतात.

डी कर्वन सिंड्रोम

या समस्येमध्ये अंगठ्च्या खालील बाजूस सूज येऊन वेदना निर्माण होतात.

क्यूबिटल टनल सिंड्रोम

Ulnar Nerve मध्ये वेदना, सूज किंवा जळजळ होते. या वेदना मानेच्या किनाऱ्यापासून सुरु होतात आणि तुमच्या बोटांपर्यंत पोहोचतात.

हात का थरथरतात किंवा कापतात?

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, हात थरथरणं हे अनेकदा काही प्रमाणात आजारपणामुळे होऊ शकतं. ज्यामध्ये पार्किंसंस रोग, मल्टीपल स्केलेरोसिस, विटामिन बी 12 ची कमतरता, थायरॉईड आणि काही प्रकारच्या औषधांचा समावेश आहे.