Health Tips : सतत पाय हलवण्याची सवय असू शकतो गंभीर आजाराचा धोका

तुम्हालाही बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय? या आजाराचे संकेत तर नाहीत?

Updated: Jun 10, 2022, 04:56 PM IST
Health Tips : सतत पाय हलवण्याची सवय असू शकतो गंभीर आजाराचा धोका title=

मुंबई : बऱ्याचदा आपल्याला बसल्यावर पाय हलवण्याची सवय असते. कधीकधी नुसतं बसल्यावरही नकळत आपले पाय हलायला लागतात. काहीवेळा आपण मुद्दाम पाय पुढेमागे किंवा एकाच जागी हलवत राहातो. पण पाय हलवण्याची सवय चांगली नाही असं म्हणतात. मन स्थिर नसलं की असं होतं असं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का? ही सवय एक गंभीर आजारापर्यंत नेऊ शकते? 

तुम्हाला माहीत आहे का की हे एखाद्या आजाराचे लक्षण देखील असू शकते. खुर्चीवर बसताना पाय थरथरण्याचे काय असू शकतं कोणत्या आजाराचा हा धोका आहे याबद्दल जाणून घेऊया.  

तुम्हाला लेग्स सिंड्रोम आजाराचा धोका असू शकतो. 10 टक्के लोकांना हा आजार असतो. हा आजार मज्जासंस्थेशी संबंधित आहे. महिला आणि पुरुष दोघांमध्येही हा आजारा आढळून येऊ शकतो. 10 टक्के लोकांना या आजाराची लक्षणं असल्याचं समोर आलं आहे. 

झोपताना किंवा बसताना अचानक दुखापत होऊ लागते आणि त्यानंतर सतत पाय हलत राहातो. पाय हलवल्याने दुखापत कमी होत असल्याचं जाणवतं. जेव्हा ही स्थिती सतत होत राहाते तेव्हा त्याला रेस्टलेस लेग्स सिंड्रोम असं म्हटलं जातं. ही समस्या शरीरात लोहची कमतरता जाणवल्याने होते. 

या आजारामागचं नेमकं कारण सांगणं अत्यंत कठीण आहे. काहीवेळा हा आजार जेनेटिक असू शकतो असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आई-वडिलांना जर हा आजार असेल तर तो मुलाकडेही येऊ शकतो. त्यामुळे यासाठी डॉक्टरांना योग्यवेळी दाखवणं महत्त्वाचं आहे. 

हा आजार बरा करण्यासाठी फिजिओथेरपी उपचार घेतले जाऊ शकतात. तुम्हालाही जर अशी सवय लागली असेल किंवा हा त्रास जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका. वेळीच त्याकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.